तंत्र टोमॅटो लागवडीचे…

ई-ग्राम : एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परिक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. नत्र, स्फुरद व पालाश व्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक व दुय्यम अन्नद्रव्य तसेच जस्त, लोह, बोरॉन, मॅगेनीज व तांबे इ. सूक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार वापरावीत.

अ) सेंद्रिय खते – प्रति हेक्‍टरी 25 टन शेणखत व 200 किलो निंबोळी पेंड.

ब) रासायनिक खते – मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरित वाणासाठी हेक्‍टरी 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद व 150 किलो पालाश, तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 100 किलो पालाश द्यावे. याशिवाय संकरित व सुधारित आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट, 25 किलो मॅगेनीज सल्फेट, पाच किलो बोरॅक्‍स आणि 25 किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे.

क) जैविक खते – एकरी दोन किलो ऍझोटोबॅक्‍टर, दोन किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व दोन किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व एक टन शेणखतात मिसळून द्यावे.

खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र 15, 25, 40, 55 दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर पाच ते सात दिवसांनी द्यावीत

साभार : किसान न्यूज चॅनेल.

Read Previous

शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज देश विसरला नाही – कॉंग्रेसचा पलटवार

Read Next

अनुदान न मिळाल्याने शेतकरी हैराण