जमिनीचा ऑनलाईन फेरफार कसा पहायचा?; वाचा सविस्तर

Smiley face 3 min

टीम ई ग्राम – सातबारा, गाव नकाशा, ८-अ या शब्दांसारखाच जमिनीशी निगडीत ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे ‘फेरफार’. जमिनीचा फेरफार म्हणजे गाव नमुना-६ होय. गावपातळीवर हा फेरफार खूप महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या जमिनीची खरेदी विक्री, त्यावरील वारस नोंदी, शेतीवर बोजा चढवणे यासंदर्भातील सरकारी कागदाला जमिनीचा फेरफार उतारा म्हणतात. बऱ्याचदा जमिन खरेदी विक्रीच्या कामांसाठी फेरफार उताऱ्याची गरज लागते. यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिझवावे लागतात. मात्र, आता तुम्ही घर बसल्या तुमच्या गावातील फेरफार नोंदींची माहिती ऑनलाईन पाहू शकता. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसून विभागाने ‘आपली चावडी’ हा प्रकल्प राबविला आहे.

काय आहे ‘आपली चावडी’ प्रकल्प –
कोणत्याही महसूली कामामध्ये फेरफाराची स्थिती म्हणजे फेरफारची नोटीस, फेरफारचा तपशील होय. यामध्ये फेरफारची हरकत आली आहे का, फेरफार मंजूर झाला आहे का आणि त्याचा अद्यावत सातबारा पाहण्याची सुविधा सामान्य नागरिकांसाठी आपली चावडी या संकेतस्थळावर उपल्ध करून दिलील आहे.

View 7/12 (Mahabhulekh ७ /१२ पहा) Digital SatBara - 2020

ऑनलाईन फेरफार कसा पहायचा? –
फेरफार ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वात अगेदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in सर्च करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट उघडेल. या वेबसाईटवर उजव्या बाजूला आपली चावडी नावाचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर Digital Notice Board नावाचे पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तालुका आणि गावासमोरील रकान्यामध्ये आपले गाव निवडायचे आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर ‘आपली चावडी पहा’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर गावातील फेरफाराच्या नोंदी उघडल्या जातील.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार
फेरफार उतारा

यामध्ये तुम्हाला फेरफार नंबर सुरूवातीला दिसेल. त्यानंतर फेरफारचा प्रकार म्हणजे त्या शेतजमिनीवर बोजा चढविला आहे की नाही, वारसाची नोंद आहे की नाही, जमिनीची खरेदी या नोंदी असतात. त्यापुढे फेरफारचा दिनांक, हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख आणि ज्या गट क्रमांकाशी निगडीत जमिनीचा व्यवहार झाला आहे तो गट क्रमांक याची माहिती दिलेली असते. याच्या शेवटी ‘पहा’ हा पर्याय दिलेला असतो.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

यासमोरील ‘पहा’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. गाव नमुना-९ म्हणजेच फेरफाराची नोटीस असे या पेजचे नाव आहे. यामध्ये सुरुवातीला तालुक्याचे नाव आणि त्यापुढे गावाचे नाव दिलेले असते. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेली असते. यामदील पहिल्या रकान्यात फेरफारचा नंबर दिलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकारांचे स्वरूप सांगितलेले असते. यामध्ये जमिनीचा कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला आहे आणि तो कोणाकोणामध्ये झाला आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. तसेच पुढे हा व्यवहार कोणाकोणाच्यात झाला याची माहिती दिली आहे.

यानंतर तिसऱ्या रकान्यात ज्या शेतजमिनीवरील अधिकार संपादित केले आहेत, त्या शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर खाली या फेरफार नोंदी संदर्भात काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे १५ दिवसांच्या आत कळवावी. अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असे समजले जाईल, अशी सुचना तिथे दिलेली असते.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

आपली चावडी अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा –
आपली चावडी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता घर बसल्या सुविधा मिळणार आहेत. सध्या यामार्फत तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘नोटीस पहा’ या रकान्यात नागरिक फेरफारची नोटीस पाहू शकतात. त्यानंतर फेरफारवर कोणी हरकत घेतली आहे का?, हरकतीचा शेरा आणि त्याचा तपशील दिलेला असतो. या हरकतींसाठी १५ दिवसांचा अवधी दिलेला असतो. या कालावधी दरम्यान कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारवरील नोंद प्रमाणित केली जाते आणि ती सातबऱ्यावर नोंदवली जाते.

त्यानंतर यामध्ये ‘मोजणीची नोटीस’ हा तिसरा पर्याय आहे. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा नोंदणी क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीला येणाऱ्या कर्मचाऱ्याची नावे आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. तसेच शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App