“राज्यातील काँग्रेसला निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला?”

Smiley face < 1 min

ई ग्राम : सत्तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची अवस्‍था ‘डबल ढोलकीसारखी’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील वाढत्या कोरोना संकटाला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्‍या विधानावर आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले, की राहुल गांधीचे विधान हे दुटप्‍पी आहे. सरकारमध्‍ये राहायचे आणि आम्‍हाला निर्णयाचे आधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे मग सरकारमध्‍ये तुम्‍ही थांबलातच कशाला?

egram

तत्‍काळ सरकारमधून बाहेर पडण्‍याची हिंंमत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलिदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्‍हणून जबाबदारी झटकायची, असे दोन्‍ही बाजूने बोलायचे कसे चालेल? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App