अर्थसंकल्पात आरोग्य सेवेबाबत घोषणा : वाचा सविस्तर

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळात सादर केला. मंत्रालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अजित पवार यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला. यात अजित पवार यांनी आरोग्यसेवा बाबतही घोषणा केली आहे.

आरोग्य सेवाबाबत केलेल्या घोषणा
१. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन – २०२० – २१ व सातारा, अलिबाग व अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन – २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षापासुन सुरु करण्याचे नियोजन.
२. महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत एकंदर ९९६ उपचार प्रकारांचा समावेश प्रधिकृत रुग्णांलयाची संख्या ४९६ वरुन १०००.
३. पॅलिएटीव्ह केअर संबंधी नवीन धोरण निश्चित करणार.
४. पाटण जि. सातारा येथील ग्रामीण रुग्णालय व साकोली,जि.भंडारा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये रुपांतर .
५. सार्वजनिक आरोग्य विभागासाठी रुपये २ हजार ४५६ कोटी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी रुपये ९५० कोटींचा नियतव्य.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App