विदर्भात कमाल तापमानात वाढ; हवामान खात्याची माहिती

Smiley face < 1 min

पुणे : कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू लागल्याने कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भात कमाल तापमानात वाढ होत असून, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी आहे. आज बुधवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १०.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थितीचा प्रभाव कायम असल्याने काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर भागांत उन्हाचा चटका वाढत आहे.

egram

अकोला येथे आज बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंशसेल्सिअसपर्यंत वाढला होता. तसेच चंद्रपूर येथे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले होते. विदर्भात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उन्हाचा पारा वाढत आहे. दुपारी चांगलाच चटका वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यात अकोला, बुलडाणा, वर्धा या भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात जवळपास चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमानात कमाल व किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. किमान तापमान तापमान १० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App