भारतातील चिकन सुरक्षित : डॉ. मलिक

Smiley face < 1 min

ई-ग्राम : चिकनमध्ये कोरोना विषाणू असल्याच्या खोट्या पोस्ट प्रसूत करून कोंबड्यांचे बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. चालू पंधरवड्यात सुमारे 40 टक्क्यांनी ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात नरमाई झाली आहे. “कोरोना विषाणूचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात कोरोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही. यामुळे भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत,” असे केंद्रीय पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सांगली आणि औरंगाबाद या प्रमुख ब्रॉयलर्स उत्पादक विभागात उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या निम्मा दरही मिळत नसल्याचे चित्र आहे. ता. 2 फेब्रुवारी नाशिक विभागात 73 रुपये प्रतिकिलो लिफ्टिंग रेट ब्रॉयलर कोंबड्यांना मिळत होता. त्या तुलनेत सोमवार ता. 10 रोजी 45 रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव नरमल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. देशभरात ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाल्यानंतर पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात केंद्रीय पशुपालन विभागाकडे स्पष्टीकरण मागीतले होते. या दरम्यान, पोल्ट्री उद्योजकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पशूपालन मंत्री गिरिराज सिंह यांची भेट घेतली. पोल्ट्री उद्योगातील सध्याच्या पेचप्रसंगाकडे लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर, भारतीय पोल्ट्री उत्पादने ही ग्राहकांसाठी सुरक्षित असून, याबाबत जनजागृती घडवण्याचे निर्देश मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या विभागाला दिले आहेत.

वाचा:  गृहिणींनो आता दुधी भोपळ्यापासून बनवा टुटीफ्रूटी अन् पावडर

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. “सध्या समाज माध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद भारतात नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत, ” असे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे.

वाचा:  कांद्याचे भाव घसरले; निर्यातबंदीचा परिणाम

भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहे. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे 100 डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. 

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App