भारतीय बियाणे साठवले जाणार उत्तर ध्रुवावर

Smiley face < 1 min

मुंबई – जगातील सहा कृषी संशोधन संस्थांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून महत्त्वाची बियाणे उत्तर ध्रुवावर १०० वर्षांसाठी साठवली जाणार आहेत. या उपक्रमातून बियाण्यांची प्रतिकार क्षमतेचा अंदाज घेण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्या येत आहे. भारतातील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरीड ट्रॉपिक या संस्थेने या उपक्रमात भाग घेतला आहे.

भारताकडून या प्रयोगात हरभरा, भुईमुग, बाजरी आणि तूर या पिकांचा समावेश आहे. उत्तर ध्रुवावर एका अज्ञात ठिकाणी जागतीक बियाणे साठा तयार करण्यात आला आहे. हा साठा नॉर्वे ते उत्तर ध्रुवामध्ये असलेल्या एका डोंगारात आहे. दर १० वर्षांनी बियाणे बाहेर काढून त्यांचे आयुष्याची मोजणी करण्यात येईल. तेथे ठेवलेल्या बियाण्यांना मोड येण्यास किती वेळ लागेल, याचा अंदाज घेतला जाईल.

egram

जगातील अन्न साठा पुनर्जिवीत करण्यासाठी हा प्रयोग उपयोगी ठरु शकतो. एकूण १३ पिकांच्या बियाण्यांचा जनुकीय माहिती साठवण्यात येणार आहे. या पैकी ४ बियाण्यांची माहिती भारताकडून जाणार आहे, असे इक्रिसॅटचे शास्त्रज्ञ वानीया अ‌ॅवेझेडो म्हणाल्या. उत्तर ध्रुवावर भारताकडून जे बियाणे जाणार आहे त्यांना पहिल्यांदा प्रयोगशाळेत उणे १८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येईल आणि २०२३ पर्यंत उत्तर ध्रुवावर पाठवण्यात येईल.

या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात जर्मनीतून बार्ली, मटार, गहू आणि लेट्यूस यांच्या बियाण्याची रवानगी झाली आहे. भारत आणि जर्मनी व्यतिरीक्त थायलंड आणि पोर्तुगाल या देशांचा समावेश आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App