‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’

Smiley face < 1 min

अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणात सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मिळालेला नाही. या सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करून शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणी भारत कृषक समाजाने शासनाकडे केली आहे. या बाबत भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी निवेदन दिले.

वाचा:  खरीप पिके पाण्याखाली; पाच मंडळांत अतिवृष्टी

जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर पीक पाहणी समितीने सगळीकडे घोळ केल्याच्या व प्रत्यक्षात शेतात न जाताच घरी बसून अहवाल तयार केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. एक महिन्यापासून याची चौकशी सुरू असून, ऐन हंगामाच्या वेळीच शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे.

दरम्यान, विमा कंपन्यांची मुजोरी कोणाच्या भरवशावर सुरू आहे. याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. कृषी व महसूल विभागाची भूमिका संशयास्पद आहे. करोडोंचा प्रीमीयम भरल्यावर व ५० टक्क्यांवर नुकसान झाले तरी सुद्धा विमा भेटत नसेल तर भविष्यात शेतकरी या योजनेपासून दूर जातील. तरी या प्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी उचित कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. मानकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विमा अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

वाचा:  पशुवैद्यकीय दवाखान्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; आमदारांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App