आजही धो-धो बरसणार! पुण्यासह ‘या’ पाच जिलह्यांत अतिवृष्टीचा इशारा

Smiley face < 1 min

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

वाचा:  आनंदाची बातमी! जिल्ह्यातील ‘ही’ अकरा धरणे १०० टक्के भरली

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत २०४.४ मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. गुरुवार नंतर राज्यात पावासाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

egram

मागील दोन दिवसांत रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यात अनुक्रमे १३५.५ आणि १३७.७ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या दोन जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

वाचा:  केळीचे घड झाडावरच पिकू लागले; नुकसानभरपाई देण्याची मागणी

मॉन्सून’ने देश व्यापला
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) २१ मे रोजी सुरू झालेल्या मॉन्सूनने दिल्लीसह संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता.१३) जाहीर केले. पुरेसे अनुकूल हवामान नसल्याने वायव्य भारतात जवळपास महिनाभर मॉन्सूनचे आगमन लांबले. चालू वर्षी सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस उशिराने मॉन्सून देशभर पोहोचला आहे. मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

वाचा:  ई-पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणेमार्फत राबवा; बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App