पाऊस सुरूच! कोकणातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Smiley face 2 min

मुंबई : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आणि बचावकार्याचे आदेश दिले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसंच प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केलं आहे.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता श्री तिरमणवार आदींची उपस्थिती होती.

egram
वाचा:  भारत बंद यशस्वी करा; शेतकरी कामगार मोर्चातर्फे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड  रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत  माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वाशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहत आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात मुसळधारेचा इशारा; कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण परिसरात देखील जोरदार पाऊस आहे. भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे.

वाचा:  काबुली हरभरा दर सुधारण्याची चिन्हे

दरम्यान, बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच याबाबत प्रशासकीय यंत्रणांना देखील सांगण्यात आलं आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App