दसऱ्यापूर्वीच गुऱ्हाळांची धुराडी पेटली

Smiley face < 1 min

कोल्हापूर – कागल तालुक्यातील बाचणी, केंबळी परिसरात दरवर्षी दसऱ्यानंतर गुऱ्हाळ घरे सुरू होतात. यंदा मात्र दसऱ्यापूर्वीच गुऱ्हाळांची धुराडी पेटली आहेत. उसाच्या पिकाची वाढ चांगली झाली आहे. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने साके, व्हनाळी केंबळी बाचणी, बेलवळे या परिसरातील बंदिस्त आणि इंधनाची पुरेसा साठा असणारी गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.

सध्या गुळाचा दर क्विंटलला चार हजार ते चार हजार दोनशे असल्याने गुऱ्हाळ मालकांनी गुऱ्हाळांसाठी स्वतःच्या क्षेत्रातील ऊसतोड सुरू केली आहे. ८६०३२, ९२००५ या ऊस जातीच्या रिकव्हरी असणाऱ्या ऊस तोडी सुरू आहेत. पूर्वी वीस, अठ्ठावीस किलोच्या गुळाच्या ढेपा (रवे) यांना मागणी नसल्याने सध्या पाच, दहा तसेच किलो, दोन किलोच्या ढेपा (पिल्ली) तयार करण्यांकडेच गुऱ्हाळ मालकांचा ओढा आहे. साखर कारखाने ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार असल्याने खोडवा तोडून लागणी करण्यासाठी विलंब होऊ नये म्हणून काही शेतकरी ऊस गुऱ्हाळ घरावर पाठवत आहेत.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App