भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी; कसा कराल अर्ज

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री योजने अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. बारावीमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स हे विषय घेवून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासाठीचे प्रशिक्षण जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे.

टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी १ वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्य दलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते.

egram

पदांची संख्या – ९०
वयाची अट – २ जुलै २००१ ते १ जुलै २००४ या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील.
पात्रता – बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान ७० टक्के गुण अनिवार्य आहेत.

अर्ज कसा करायचा?
सैन्य दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.in वर जाऊन online application पर्यायावर क्लिक करावे. आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज करावा. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. http://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/TES_44.pdf?_ga=2.33703073.1269645420.1598358955-853919411.1593259172 या लिंकवर जावून तुम्ही आवश्यक ती माहिती पाहू शकता.

निवड प्रक्रिया
उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि शॉर्टलिस्टमधील उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल. मुलाखत प्रक्रिया ऑक्टोबर २०२० नंतर सुरू होईल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत – ९ सप्टेंबर २०२०
अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या http://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App