खुशखबर! टपाल विभागात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या प्रक्रिया

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम – भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये नोकरीची संधी तरुणाईसाठी चालून आली आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण १३७१ पदे भरण्यात येणार असून यासाठी इच्छूक, पात्र तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. पोस्टातील पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ ) एमटीएस) या जागांसाठीची ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही मुदत ३ नोव्हेंबरपर्यंतच होती. मात्र, त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

वाचा:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनातील इच्छा बोलून दाखवली असेल – देवेंद्र फडणवीस

अशी आहेत पदे –
पोस्टमन – १०२९
मेलगार्ड – १५
मल्टी टास्किंग स्टाफ – ३२७.

egram

वयोमर्यादा –
या भरती प्रक्रियेसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजीचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. या तिन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे यामध्ये असायला हवे.

काय आहे पात्रता –
पोस्टमन आणि मेल गार्ड अशा दोन पदांसाठी इच्छूक उमेदवार, इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या स्थानिक भाषा मराठी असणे बंधनकारक आहे. उमेदवाराला मराठी भाषेची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात एमटीएस या पदासाठी इच्छूक उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याशिवाय मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. ही भरती प्रक्रिया कम्प्युटरवर आधारित परीक्षेने होईल. त्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

वाचा:  पीक पेरा नोंदणीला प्रतिसाद कमीच

वेतन –
पोस्टमन तसेच मेलगार्ड या पदांसाठी निवडलेल्या उमेदावाराला २१,७०० ते ६९,१०० असा तीन श्रेणींमध्ये पगार मिळेल. मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात एमटीएससाठी पगार लेव्हल १ नुसार असेल. १८,००० ते ५६,९०० रुपये असा पगार दिला जाणार आहे.

परीक्षा शुल्क –
परीक्षेसाठी एससी, एसटी, महिला आणि पर्सन विथ डिसॅब्लिटी प्रवर्गातील १०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर अनारक्षीत, ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क असेल.

वाचा:  पंचनाम्याच्या फेऱ्यात अडकली अतिवृष्टीची मदत; मराठवाड्यात २० लाख शेतकऱ्यांचे नुकसान
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App