देशातल्या ‘या’ मोठ्या बँकांमध्ये नोकरीची संधी; भरती प्रकिया सुरू

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – देशातील युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांमध्ये लिपिक पदाच्या जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) ने या भरती संदर्भातील अधिसुचना जारी केली आहे. आयबीपीएस लिपिक २०२१-२२ यावर्षी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (सीआरपी) माध्यमातून १ हजार ५२८ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या पदांसाठी २ सप्टेंबर २०२० पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. ज्यांना आयबीपीएस लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत, ते उमेदवार आयबीपीएस अ‌ॅप्लीकेशन पोर्टल ibpsonline.in वर नोंदणी करू शकतात. लिपिक पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २३ सप्टेंबर २०२० असणार आहे. तसेच २३ सप्टेंबर २०२० पर्यंत लिपिक पदासाठी परिक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरणे, अर्जात बदल करणे आणि अर्जाची प्रिंट काढता येईल. संकेतसेथळावरून उमेदवार आयबीपीएस लिपिक अधिसुचना २०२० डाऊनलोड करू शकतात. तसेच लिपिक २०२० ऑनलाईन अर्जाच्या पृष्ठावर प्रवेश करू शकतात.

egram

कोण अर्ज करू शकेल –
आयबीपीएस लिपिक २०२० ऑनलाईन अर्जासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी पास केली असावी. आयबीपीएस पोर्टलवर नोंदणीच्यावेळी पदवीधर मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र उपलब्ध असावे, जेणेकरून त्यांचा उत्तीर्ण टक्केवारी ऑनलाईन फॉर्म भरताना प्रवेश करण्यास सक्षम व्हावा. शैक्षणिक पात्रतेसह उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२० ला किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे. त्यानुसार उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वी आणि १ सप्टेंबर २००० नंतर झालेला नसावा. ज्यात दोन्ही तारखांचा समावेश असेल.

आयबीपीएस लिपिक भरती २०२० अर्ज प्रक्रिया –
आयबीपीएस लिपिक २०२० ऑनलईन अर्जासाठी पोर्टलला भेट दिल्यानंतर उमेदवारांनी प्रथम नविन नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. नोंदणीसाठी नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचा तपशील भरावा लागेल. नोंदणीनंतर उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द संस्थेद्वारे ई मेल आणि मोबाईल नंबर पाठविला जाईल. ज्याद्वारे उमेदवार लॉग इनद्वारे त्यांचे आयबीपीएस लिपिक २०२ ऑनलाईन अर्ज भरू शकेल.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App