विमा कंपनीकडून फक्त टोलवाटोलवी

Smiley face 2 min

पुणे : पावसामुळे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडून मदत देण्याचे दूरच असते. साधे फोन सुद्धा उचलत नाहीत, त्यामुळे आम्ही विमा भरण्याचे सोडून दिले आहे. चालू वर्षी भातपट्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला नाही. त्या संदर्भात वारंवार कंपनीशी संपर्क साधले पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. उलट टोलवाटोलवी केली जात असून, जबाबदारी झटकण्याचे काम विमा कंपनी करत असल्याचा आरोप भात उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील २८ हजार ४६७ शेतकरी सहभागी झाले होते. त्यापोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता. परंतु अवकाळी पाऊस, गारपिठीमुळे तब्बल ५ लाख १८ हजार १८५ शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यापैकी अवघ्या २ हजार ३१४ शेतकऱ्यांना ९५ लाख ६८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती. अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. त्यामुळे चालू वर्षी राबविलेल्या पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी अक्षरश पाठ फिरवल्याचे चित्र होते.

egram
वाचा:  “पीकविमा कंपनीच्या बाबतीत देशभर बोंब”

यंदा शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या पीकविमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर आठ दिवस मुदत वाढविण्यात आली होती. पुणे जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या कंपनीची निवड करण्यात आली होती. त्यासाठी टोल फ्री १८००२६६०७०० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मात्र, मागील तीन दिवसापूर्वी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले. त्यासंबधी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून कल्पना दिली. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना देण्यात आल्याने कृषी विभागाचे काही कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.

वाचा:  आनंदाची बातमी! राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू

परंतु यामध्ये विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी फिरकले नसल्याची स्थिती आहे. दिलेला क्रमांकही बहुतांश वेळा बिझी असल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे कंपनीने जिल्हा स्तरावर कार्यालय सुरू करणे आवश्यक आहे. या शिवाय तेथे कर्मचारी असणे गरजेचे आहे. असे कोणतेही कार्यालय नसल्याचे धक्कादायक माहिती शेतकरी सांगत आहेत.

“माझ्याकडे एकूण शेती अडीच हेक्टर शेती आहे. त्यामध्ये भात ३० गुंठ्यावर भात लागवड केली होती. दहा गुंठे नुकसान झाले. तीन एकरावर फळबागा असून, दीड एकरावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. या संबधी विमा कंपनीकडे तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु अनेक वेळा तो नंबर लागत नसल्याचे आढळून आले.”
प्रदीप दिघे, शेतकरी वारवंड (ता. भोर)

वाचा:  गुजरात मुख्यमंत्री पदाच्या यादीत ‘या’ नावांची जोरदार चर्चा

“तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धा एकरावरील भात लागवड वाहून गेली आहे. यंदा कर्ज काढून सात एकर शेतीपैकी दोन एकरावर भात लागवडी केली होती. पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. तर नाचणीच्या एक एकरांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी विमा काढला होता. त्यानंतर पावसामुळे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्या संबंधी वारंवार विचारणा केली होती. परंतु विमा कंपन्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चालू वर्षी विमा भरला नाही.”
मारुती कोढाळकर, शेतकरी, कोंढरी (ता. भोर)

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App