काबुली हरभरा ८ हजारावर; शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत

Smiley face < 1 min

जळगाव : खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर स्थिर असून, शेतकरी दरात वाढ होण्याची प्रतीक्षेत आहेत.

देशी हरभऱ्याच्या तुलनेत आकाराने मोठा, रंगाने बासुंदी असलेला काबुली हरभरा खानदेशातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा देवून जातो. परंतु गेले तीन वर्षे दर कमी मिळाले आहेत. कारण गेल्या वर्षी लॉकडाऊनचा फटका बसला. त्यापूर्वी पेरणी अधिक झाल्याने दर कमी राहीले. गेल्या वर्षी सरासरी साडेसहा हजार रुपये दर मिळाला होता. यंदा दर सुरवातीला बऱ्या स्थितीत आहेत. किमान आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर या हरभऱ्यास मिळत आहे.

egram

जळगावमधील चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर या बाजार समित्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. यंदा खानदेशात सुमारे सात हजार हेक्टरवर काबुली हरभरा पीक होते. त्याची मळणी गेल्या आठवड्यातच सुरू झाली. मळणी सुरू झाली. पण सुरवातीला अपेक्षित दर मिळत नसल्याने काही शेतकरी घरात साठा करून ठेवत आहेत. शासकीय खरेदीत काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर जाहीर केलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना या हरभऱ्याची विक्री बाजारातच करावी लागेल. परंतु दर गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीसे अधिक असल्याने शेतकऱ्यांना पुढेही दरवाढीची अपेक्षा आहे.

या हरभऱ्याची पेरणी जळगावमधील चोपडा, रावेर, यावल, जळगाव यासह धुळ्यातील शिरपूर भागात अधिक झाली होती. चोपडा तालुक्यात या हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन शेतकरी घेतात. यंदा एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन येत आहे.

दरम्यान, सध्या चोपडा, अमळनेर, शिरपूर येथील बाजारात आवक सुरू आहे. या बाजारांमध्ये मिळून प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल आवक होत आहे. आवक गेल्या वर्षाच्या तुलनेत ३०० क्विंटलने कमी आहे. परंतु पुढे आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App