कडबा कुट्टी यंत्र मिळणार ५० टक्के अनुदानावर

Smiley face < 1 min
कडबा कुट्टी यंत्र
कडबा कुट्टी यंत्र

बुलडाणा – जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्याच्या अमुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा, चारा वाया जावू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प (एनडीडीबी), राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत ५० टक्के अमुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत डीबीटीनुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कुट्टी यंत्र ख्ररेदी करावे. यानंतर त्याचे जीएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पंचायतीच समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्याकडे सादर करावा.

वाचा:  ९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’

या यंत्राद्वारे चारा कापणी केल्यामुळे चारा वाया जात नाही. चाऱ्यावरील खर्च कमी होतो आणि चाऱ्याची पौष्टिकता वाढून दुधातील फॅट्स, एसएनएफ वाढण्यास मदत होते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. तरी जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी केले आहे.

वाचा:  शेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App