दूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची मागणी

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – गेल्या काही दिवसांपासून राज्यात दूधाला मिळणाऱ्या दरावरून आंदोलन सुरू आहे. दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा यासाठी हे आंदोलन केले जात आहे. दूध दराच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेने केली आहे.

वाचा:  पुणेकरांच्या 'लाईफ'शी खेळ; जम्बो कोविड सेंटरमधल्या बेपत्ता महिलेचा शोध लागेना

राज्यात गेल्या काहाी दिवसांपासून दूधाला मिळणाऱ्या दरावरून आंदोलन सुरू आहेत. दूध दराच्या या आंदोलनात आता भाजपनेही उडी घेतली आहे. राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून दूध दरवाढीची मागणी करणार आहेत.

दरम्यान, टाळेबंदीच्या काळात दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण देत दूध संघ आणि कंपन्यांनी दुधाचे खरेदीचे भाव १० ते १२ रुपयांनी कमी केले आहेत. दूधाच्या विक्री दरात मात्र केवळ २ रुपयांची कपात केल्याने ग्राहक आणि शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.

वाचा:  राज्यात पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App