कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा

Smiley face < 1 min
कोयना धरण
कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा

सातारा – वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. सध्या धरणात ५१.२१ टीएमसी म्हणजेच ४८.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्याने धरणाच्या पाणीसाठा कमी झाला आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत ७.४४ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या दृष्टीने जूलै आणि ऑगस्ट महिन्याचा पाऊस उपयुक्त असतो. मात्र, जुलै महिन्यात पाऊस गायब झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती जैसे थे आहे. कोयना धरण्याचे भवितव्य आता ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर अंवलबून आहे.

सध्या धरण क्षेत्रात हलका पाऊस सुरू असल्याने प्रतिसेंकद धरणात ४ हजार ८२१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. परिणामी कोयना धरणात गत वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणात गतवर्षी आजच्या तारखेला ५८.६५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. तर यावर्षी ५१.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. तुलनेत यावर्षी ७.४४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

दरम्यान, पावसाच्या दडीचा फटका शेतकऱ्यांसह धरणातील पाण्यालाही बसू लागला आहे. पुढील काळात पावसाचा जोर कसा रहातोय यावर धरणे भरणार की नाही हे ठरणार आहे. गतवर्षी अतिपावसाने जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून १३० टीएमसी पाणी विनावापर सोडावे लागले होते. जास्त पाऊस झाल्याने धरणातील पाण्याचा वापर कमी झाल्याने पाणीसाठा जास्त शिल्लक राहिला होता. या वर्षी मात्र विरूध्द परिस्थिती निर्माण झाली आहे. जून,जुलै हे दोन महिने पावसाविना गेल्याने धरणात आवश्यक पाणीसाठा होऊ शकलेला नाही. पुढील काळात किती व कधी पाऊस होईल यावर धरणातील पाणीस्थिती ठरणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App