घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार देतयं मोठं अनुदान; असा करा थेट अर्ज

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – विजेची कमतरता दूर करण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकार काम करीत आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी राज्यात आणि केंद्रीय पातळीवर नवनवीन योजना चालवल्या जात आहेत. तर हरियाणा सरकारने मनोहर ज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. तर चला पाहुयात नेमकी काय आहे ही योजना.   

शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांना सौर पॅनेलचे वितरण करण्याकडेही आता लक्ष्य दिले आहे. सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च असल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. ही समस्या लक्षात घेऊन हरियाणा सरकार (Haryana Government)   सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यासाठी मोठे अनुदान देत आहे.

वाचा:  महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर जबरी टीका, म्हणाले...

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. सर्वसामान्यांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणारे पैसे हे पुन्हा माघारी करण्याची गरज नाही. तसेच तुम्ही बसवणाऱ्या सौर पॅनेलमधूनच तुम्हाला वीज मोफत मिळणार आहे. यामुळे येणारे विजेचे बीलही कमी स्वरूपात येणार आहे.

काय आहे सरकारची योजना?
हरियाणा सरकारने सोलर पॅनेलला चालना देण्यासाठी मनोहर ज्योती योजना (Manohar Jyoti Yojana)  सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सौर पॅनेल मिळणे हे सरकारचे लक्ष्य आहे. तसेच सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार अनुदानही देते.   

वाचा:  बाजरीची पेरणी १५ हजार हेक्टरवर; खानदेशातील स्थिती, क्षेत्रात वाढ

नेमकी काय मनोहर ज्योती योजना
या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात १५० वॅटचे सौर पॅनेल लावले जाते. त्या व्यतिरिक्त एक बॅटरी, ६-६ वॅटचे दोन बल्ब, ९ वॅटची ट्यूबलाईट, २५ वॅटचा सिलिंग फॅन आणि १ मोबाईल चार्जिंग पॉईट सुद्धा दिला जातो.  

किती मिळते अनुदान
घरात १५० वॅटचा सौर पॅनेल लावण्यासाठी साधारणत: २२ हजार ५०० रूपयांपर्यंत खर्च येतो. राज्य सरकार यासाठी १५ हजार रूपयांपर्यंत अनुदान देते. यामुळे नागरिकांना ७ हजार ५०० रूपये जमा करून योजनेचा लाभ घेता येतो.

वाचा:  ‘जंतर-मंतर’वर होणार ‘किसान संसद’

या सरकारी योजनेचा कसा घेणार लाभ
सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाजवळ रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आधार कार्ड, बँकेत खाते असणेही आवश्यक आहे. जर ही सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

या लिंकवर करा अर्ज
http://hareda.gov.in/en/rate-contract-for-supply-installation-commissioning-of-solar-home-systems-manohar-jyoti-in-the

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App