पारगाव : मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील शीतल सतीश मेंगडे पाटील यांनी लग्नानंतर कुटुंब, संसार आणि मुलगी यांची जबाबदारी सांभाळत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयार केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवून खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची मुंबई पोलिस दलात पोलिस उपनिरिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
शीतल यांचे माहेर तालुक्यातीलच जवळेतील लायगुडे परिवार आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळे येथे तर माध्यमिक शिक्षण निरगुडसर येथे झाले. शीतल या २०१२ मध्ये लग्न होऊन मेंगडे पाटील परिवारात दाखल आल्या. त्यांचे पती सतीश हे बजाज कंपनीचे कर्मचारी आहेत.
लग्नानंतरही पुढील उच्च शिक्षण सुरुच ठेवले एम.ए.,बी. एड.ची पदवी संपादन केल्यानंतर एक वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. दरम्यान, शीतल यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे यश
सासरे किसनराव मेंगडे पाटील, सासूबाई सविता, दिर नरेंद्र आणि नितीन व जाऊ अश्विनी नितीन मेंगडे पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे शीतल जिद्दीने स्पर्धा परिक्षेची तयारी केली व त्या यश मिळविले. २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्याने त्यांची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शीतल यांना सात वर्षाची मुलगी आहे.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.