पीक पेरा नोंदणीला प्रतिसाद कमीच

Smiley face 2 min

नांदेड : शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकर्‍यांनी त्यांच्या पिकांची नोंद स्वत: करावी, यासाठी ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविण्याचे काम हाती घेतले. परंतु शेतकर्‍यांकडून या ई-पिक पाहणीला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून आले होते. महिनाभरात मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या नोंदणीत अव्वल असला तरी खातेदारांच्या तुलनेत संख्या कमी आहे. सर्वाधीक खातेदार असलेला नांदेड जिल्हा मात्र पीक पेरा नोंदणी चोथ्यास्थानावर आहे.

राज्य शासनाने यंदा ई-पीक पाहणी अ्ॅपच्या माध्यमातून पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम होती घेतला आहे. महसूल तसेच कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात १५ ऑगस्टला झाली.

egram
वाचा:  पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शेतकऱ्यांचे उभे पीक कापले

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ्‌ॅपला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद देत पीक पेरा नोंदणी केली आहे. परंतु काही जिल्ह्यात मात्र अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करावी यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम १५ ऑगष्ट पासून सुरु झाला. मागील एक महिन्याच्या काळात उस्मानाबाद, हिंगोली व लातूर वगळता इतर जिल्ह्यात मात्र शेतकरी फारसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले आहे. १५ ऑगष्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधीक एक लाख ८० हजार ४४८ खातेदारांनी नोंदणी करुन अव्वल क्रमांक पटकावला आहे.

वाचा:  नाश्‍ता करून आले, अन् जेवायला घरी गेले; मंत्री तनपुरे यांच्याकडून भाजपची खिल्ली

तर त्याखाली लातूर जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ६६८, हिंगोली जिल्ह्यात एक लाख २६ हजार ७४२, नांदेड एक लाख १९ हजार २८९, ओरंगाबाद ६७ हजार ८१५, जालना ५० हजार ९८९, परभणी ३९ हजार ३६४ तर बीड जिल्ह्यात केवळ २८ हजार ८५८ खातेदारांनी पीक पेरा नोंदणी केला आहे. पीक पेरा नोंदणीची गती पाहता आगामी ३० सप्टेंबर पर्यंत पेरा नोंदणीचे काम ५० टक्क्यापर्यंतही जाण्याची शक्यता कमी दिसत आहे. पेरा नोंदणी करताना काही अडचण आल्यास शेतकर्‍यांनी ०२०२५-७१२७१२ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन महसूल विभागाने केेले आहे.

वाचा:  प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; राजकीय वातावरण तापलं

दरम्यान नांदेड जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ सातबाराधारक शेतकरी आहेत. एक सातबारावर एकापेक्षा अधीक खातेदार असतात. एका सातबारावर सरासरी दोन खातेदार गृहित धरल्यास जिल्ह्यात नऊ लाखांपेक्षा अधीक खातेदारांची संख्या असू शकते. या तुलनेत नांदेडमध्ये एका महिन्यात केवळ एक लाख वीस हजार शेतकर्‍यांनीच पेरा नोंदवला आहे.

नांदेडमधील तालुकानिहाय पेरा नोंदणी खातेदार
हदगाव २४,४२९, लोहा ११,४९८, हिमायतनगर १०,३३४, किनवट १०,१९८, मुखेड ९,१३४, मुदखेड ६,६८५, भोकर ६,४९३, देगलूर ६,४३०, नायगाव ५,४३३, धर्माबाद ४,७४६, अर्धापूर ३,९७९, कंधार ३,६९९, उमरी ३,१४५, माहूर २,९४१.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App