“कोरोना विरोधातील लढाईत मदत करू”

Smiley face < 1 min

मुंबई : कोरोना विरोधाच्या लढाईत पंतप्रधान मोदींनी काही खेळाडूंशी व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉलवर क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि ४९ खेळाडू यावेळी सहभागी झाले होते.

कोरोना विरोधातील लढाईमध्ये संपूर्ण देशभरातील पोलीस अतिशय उत्तम रित्या त्यांची कामगिरी बजावत आहेत. आपण या लढाईत नक्कीच विजय मिळवू, असे सौरव गांगुलीने पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. तसेच सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले की, लॉकडाऊनंतरही लोकांनी कोरोना संसर्गाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

वाचा:  बारामतीत सापडला कोरोनाचा १४ वा रुग्ण; रुग्ण पुण्याहून घरी परतलेला

यावेळी बोलताना भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे ओपनिंग बॅट्समन जोडी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास दिला आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू, अशी ग्वाही सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली यांनी पंतप्रधानांना दिली. मोदींनी खेळाडूंशी व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधला. यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्याव्यरिक्त महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, माजी गोलंदाज जहीर खान, युवराज सिंह आणि केएल राहुल यांचाही समावेश होता.

वाचा:  बारामतीत सापडला कोरोनाचा १४ वा रुग्ण; रुग्ण पुण्याहून घरी परतलेला

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App