‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत स्थगित

Smiley face < 1 min

औरंगाबाद : जिल्हाभरात आज बुधवारपासून (ता.३१) लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. तो लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता.३०) रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता हे देखील उपस्थित होते.

औरंगाबाद येथे मंगळवारी झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्य सचिव आणि प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनासह सर्वच दिवसरात्र एक करत प्रयत्न करत आहेत. संख्या आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

egram

परंतु लोकप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन यांनी या संदर्भात विविध सूचना केल्या. शासन लवकरच कोविड-१९ नियमावलीबाबत सुधारित सूचना देणार आहे.

दरम्यान, नंतर नव्याने आदेश देण्यात येणार असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या दरम्यान सध्या लागू असलेला आदेश नियमित सुरू राहणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App