पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहिर, काय सुरू काय बंद?

Smiley face < 1 min

पुणे : कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यात सुरूवातीच्या पहिल्या 5 दिवसांत फक्त दुध घरपोच आणि मेडीकल वगळता सर्व बंद राहणार आहे.  

कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीचा पहिल्या पाच दिवसांत कडक लॉकडाऊन असणार आहे. यात दुध आणि मेडीकल फक्त सुरू राहणार आहे. तर 19 जुलैपासून भाजीपाला आणि दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

वाचा:  लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या ‘या’ व्यवसायांकडे दुर्लक्ष

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये काय बंद राहणार?
– शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
– दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)
– मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रीडांगणे आदी
– हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल
– सलून, ब्यूटी पार्लर
-सर्व खासगी कार्यालये

काय सुरू राहणार ?
– पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)
– गॅस वितरण
– बॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम
– माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह
पुण्यात कोणाला घराबाहेर पडता येणार?
– दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण
– सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा
– मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी
– डॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार (पोलिस पाससह), जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे (पोलीस पाससह).

वाचा:  ‘बेळगावातील शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेसच्या आमदाराने हटवला’

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App