नोकरी शोधताय, मग महास्वयंम वर नोंदणी करा

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक शहरातील मजूर स्थलांतरित झाले. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने ‘महास्वयंम’ पोर्टल सुरु केले आहे.

‘महास्वयंम’ हे रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

वाचा:  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 3824 पदांची होणार हंगामी भरती

उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी ‘महास्वयंम’ https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे, उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येते, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App