महाराष्ट्राची चिंता वाढली, कोरोनामुळे चौथा बळी

ई ग्राम  : जगभर कोरोनाने हाहाकार घातला आहे. तसेच आजून कोरोना देशभर पसरत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात सध्या चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबई आणि ठाणे येथे प्रत्येकी १ रूग्ण सापडलेला आहे.  

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील काल कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आज सकाळी १२२ होता, तोच आकडा १२४ वर पोहोचला आहे. तर कोरोनाबाधित असणाऱ्या रूग्णापैकी १४ जण यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना आता डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दोन दिवसापूर्वी राज्यातील  कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता. तर आज वाशी येथे आज खाजगी रूग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील हा कोरोनामुळे चौथा बळी गेला आहे. तर देशातील १२ बळी आहे. नव्याने २ रूग्ण सापडले असून राज्यातील कोरोनाबाधिताची संख्या १२४ वर पोहचली आहे.

Read Previous

देशातल्या ८० कोटी नागरिकांना स्वस्तात मिळणार गहू, तांदूळ

Read Next

कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी किती येतो खर्च? वाचा सविस्तर