‘कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सज्ज’

Smiley face < 1 min

नगर : महाविकास आघाडी सरकार निर्माण करणे, हा एक वेगळा प्रयोग होता. त्यासाठी प्रारंभी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तयार नव्हत्या. शेवटी विचारसरणीचा प्रश्न होता; परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली. सरकार आल्यानंतर ऑक्‍टोबरपर्यंत कोरोना संकट होते. धारावीतील कोरोना संसर्ग रोखणे सोपे नव्हते. त्यानंतरही अनेक संकटे आली. सरकारची वाटचालच अडचणीतून सुरू झाली. विकासकामांसाठी पैसा कमी पडला. त्यात केंद्राकडून जीएसटीचे ३० हजार कोटी थकले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सज्ज आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात येत्या ४ दिवसांत मुसळधार; कोकण, मध्य महाराष्ट्रात ‘आँरेज अलर्ट’

श्रीरामपूर येथे पत्रकाराशी बोलताना थोरात म्हणाले, “सध्या अनेक शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयाची स्थिती पूर्वीसारखी होत आहे; परंतु कोरोना संकटाशी सरकारने अंत्यत यशस्वीपणे सामना केला. पुन्हा लॉकडाउन असा सवाल केला जातो आहे.

प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून प्रशासन योग्य तो निर्णय घेत आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु पाहिजे तेवढी लस तयार होत नसल्याने लसीकरण वाढविणे, रुग्णांवर उपचार करण्यावर सरकार लक्ष देत आहे.

वाचा:  अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य स्थिती; पिकांचे मोठे नुकसान

कोरोनासाठी केंद्राने सप्टेंबरपर्यंत मदत केली. त्यानंतर पथके पाठवून काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सरकारकडून झालेली चुका दाखवा. आता जनतेनेही काळजी घेणे गरजेचे आहे.’’;

दरम्यान, एका गावाची निवड करून नवीन वीज योजना राबविली जाणार आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी विशेष लक्ष घातले असून, पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत. आरोपींवर कठोर करवाई करून हिरण कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, असेही थोरात म्हणाले.

वाचा:  वीजतोडणी मोहिमेविरुद्ध जनहित संघटनेचे आंदोलन

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App