माझ्याकडचे व्हिडीओ क्लिप्स समोर आले तर हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Smiley face < 1 min

मुंबई – माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे आहेत, ती जर समोर आली तर हादरा बसेल. असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी खडसेंनी हा गौप्यसेफोट केला आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

या मुलाखतीत बोलताना खडसे यांनी गौप्यस्फोट केला की, त्यांच्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे जर समोर आली तर हादरा बसेल. मात्र, मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना हे सगळं दाखवलं आहे. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत, अस खडसे म्हणाले. या व्यक्तिगत बाबी आहेत. मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर त्या बाबी मांडल्या आहे. वरिष्ठांकडून मला न्याय मिळाला नाही तर मी या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडेन. यामुळे काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचे कारण नाही. जे होईल ते जनतेसमोर येईल, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला.

वाचा:  केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेला धोका; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

४० वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी सांभाळल्याचे खडसे म्हणाले. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. परंतू त्यांना राजीनामा द्या, असे सांगितले गेले नाही. मात्र माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर सुध्दा आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती त्या बँकेत वळती करण्यात आली. पदाचा दुरुपयोग केला, असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असे खडसे म्हणाले.

वाचा:  साखर कारखान्यांचे अद्यापही शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचे देणे

दरम्यान, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी पक्षाच्या विरोधात बोलतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. माझ्यावर अन्याय झाला म्हणून बोलतो आहे. अनेकांवर अन्याय झाला. माझ्या मुलीने तिकीट मागितले नसतानाही तिला तिकिट दिले. आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणाऱ्या जागी तिकिटे दिली नाहीत, त्यामुळे जागा कमी आल्या असेही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा आहे, त्यामुळेच लोकांनी नाकारले, असेही खडसे म्हणाले.

वाचा:  शेतात जायला रस्ता नाही; मग शेत रस्त्यासाठी असा करा अर्ज

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App