पंचनाम्याच्या फेऱ्यात अडकली अतिवृष्टीची मदत; मराठवाड्यात २० लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Smiley face 2 min

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या पंचनाम्याच्या फेऱ्यात नैसर्गिक आघाताने जगण्याचे साधनच हिरावलेल्या अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आस लागली आहे. अर्थात ही पंचनाम्याअंती शासन मदतीचा हात केंव्हा देते यावर शेतकऱ्यांचे सावरणे अवलंबून असणार आहे.

सातत्याने निसर्गाचे आघात होणाऱ्या मराठवाड्यात यंदा पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला. आधी पावसाच्या खंडाने काही भागातील पिकांचे नुकसान केले तर त्यानंतर अतिवृष्टीने विविध भागांतील पिके हातची हिरावली. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २० लाख ३९ हजार ६८८ शेतकऱ्यांच्या १४ लाख ७४ हजार ८१५ हेक्‍टरवरील शेतीपिक अतिवृष्टीमुळे बाधित झाली. बीड, नांदेड, जालना, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली असा जिल्ह्यांच्या नुकसानीचा क्रम राहिला.

egram
वाचा:  हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसा; वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची पळापळ

एकीकडे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी आहेत. तर दुसरीकडे पेरलेली पिकंच हातची गेल्याने वा त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने करावं तरी काय असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. नुकसान झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाहणी दौऱ्यांचा सपाटा अन्‌ पंचनाम्याचे काम सुरू झाले. नुकसानग्रस्तांना चिंता करू नये त्यांना शासन मदत करेल, अशी आश्वासनेही दिली गेली. परंतु ती मदत नेमकी मिळणार केव्हा, खरिपाचे पीक हातचे गेल्याने रब्बीची तयारी करावी कशी? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

वाचा:  विदर्भातील पाच जिल्ह्यांत ‘इतक्या’ हेक्‍टरने रब्बी क्षेत्र वाढणार

प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रांपैकी १४ सप्टेंबरपर्यंत जवळपास २ लाख ८१ हजार ५५ हेक्‍टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी केवळ १९ टक्‍के पंचनामे उरकले. विमा परताव्याचे भिजत घोंगडे आहे. काही जिल्ह्यांत मागच्या वर्षीच्या नुकसानीचा विमा परतावा अद्याप मिळालेला नाही. वेळेत कर्ज पुरवठा नाही, अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार नुकसान क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा-          शेतकरी          बाधित क्षेत्र

औरंगाबाद-      ३२६९३५          १७२०१५.१५
जालना-          २६१९२८         २२४६६६.६३
परभणी-        २२२७९४            १६१०२७
हिंगोली-        ११५००               ८९१९
नांदेड-          ४५१५८८             ३७१८५४
बीड-            ७३७२२५           ५१९४२५
लातूर-       ८४९०          ६४२२.६४
उस्मानाबाद- १९२२८          १०४८६

वाचा:  आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी; राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक

“समद ज्यावर अवलंबून होतं तेच गेलं. मदत काय देतेय याचा अजून मेळ नाही. काल पंचनामा करून गेले मदत कधी येते काय सांगावं.”
भास्कर पाटील-अटकळ, शेवगळ, जि. जालना

“२ एकर कांदे, २५०० केळीचं खोड, अडीच एकर कपाशी वाहून गेली. विहिरीवरून पूर गेले. ४ ते ५ हेक्‍टर जमीन अक्षरश: खरडून गेली. सध्या पंचनामे सुरू आहेत पण नुकसान भरपाई मिळेल केव्हा हा प्रश्‍नच आहे. आता पुराने पीक गेलं, डिसेंबरनंतर वाचलेल्या पिकांना पाणी नसल्यानं ती जाणार त्याचीही चिंता आहे. कारणं तलावच फुटून गेले.”
रवींद्र पाटील, सायगव्हाण, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App