बाजारभाव अपडेट- २३ जुन २०२०: जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरचीचे बाजारभाव.

Smiley face 3 min

ई-ग्राम : राज्यातील तरकारी पिकाचे बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे: कोबी: कोबीला मुंबई मार्केट (वाशी) येथे ८०० ते १२०० रुपयाचा दर मिळाला आहे तर १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. मुंबई मार्केटमध्ये ८७५ क्विंटल कोबीची आवक झाली आहे. कोल्हापूर मार्केटमध्ये कोबीला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी दर ८५० रुपयांचा भेटला आहे. कोल्हापूरमध्ये २४२ क्विंटल कोबीची आवक झाली होती. पुण्यात कोबीला ५०० ते ७०० रुपयाचा दर मिळाला असून बाजारभावामध्ये ३०० रुपयांची घट मागील आठवड्याच्या तुलनेत आली आहे. सरासरी ६००० रुपयांचा दर भेटला आहे. पुण्यात ३१२ क्विंटल कोबीची आवक झाली होती.

फ्लॉवर : फ्लॉवरला कोल्हापूर ५०० ते १२५० रुपयाचा दरम्यान दर मिळालं असून सरासरी ८७५ रुपयांचा दर मिळाला आहे आज कोल्हापूर मध्ये १०४ क्विंटल फ्लॉवरची आवक झाली होती. चंद्रपूर गंजवाडमध्ये फ्लॉवरला १००० ते १५०० रूपयांचा दर मिळला आहे तर १५५ क्विंटल आवक झाली होती. पुणे मार्केटमध्ये फ्लॉवरला १००० ते १५०० रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी दर १२५० रुपयांचा मिळला आहे. मुंबई मार्केटमध्ये फ्लॉवरला १६०० ते २००० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी १८०० रुपयांचा दर मिळला आहे. आज मुंबईत ४२६ क्विंटल फ्लॉवरची आवक झाली होती.

मिरीची: हिरव्या मिरचीला कोल्हापूर मार्केटमध्ये २००० ते ४००० रुपयांचा दरम्यान दर मिळाला असून ३००० रुपयांचा दर मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये १८६ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. तर मुबई मार्केटमध्ये मिरचीसाठी ३००० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी ३३०० मिरचीसाठी भाव भेटला आहे. ज्वाला मिरीचीसाठी ३३०० चा तर लवंगी मिरची साठी ३००० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. मुबंईत ८५६ क्विंटल मिरचीची आवक झाली होती. पुण्यात २००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान दर भेटला असून सरासरी २५०० रुपयांचा दर भेटला आहे. आज पुण्यात ४११ क्विंटल मिरचीची आवक झाली होती.

वांगी : वांग्याला रत्नागिरीमध्ये १००० ते २००० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला आहे. रत्नागिरी मध्ये ५४ क्विंटल वांगी विक्री साठी आलेली होती. आज क्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांची घट झाली आहे. कोल्हापूर मधील मार्केटमध्ये १००० ते ४००० रुपयाचा भेटला असून सरासरी दर २५०० रुपयांचा भेटला आहे. कोल्हापूरमध्ये ६२ क्विंटल वांग्याची आवक झाली होती. आवक घटल्याने आज २५० ते ५०० रुपयांची वाढ कोल्हापूर मार्केट मध्ये झाली आहे. पुणे मार्केटमध्ये वांग्याला १००० ते २५०० रुपयांचा भेटला आहे. सरासरी दर १७५० रुपये प्रति क्विंटल चा भेटला आहे. पुण्यात २४३ क्विंटल वांग्याची आवक झाली होती. नाशिक मार्केट मध्ये १६५ क्विंटल वांग्याची आवक झाली असून ३००० ते ५००० रुपयांचा दर राहिला आहे. सरासरी ४००० रुपयांचा दर भेटला आहे.

शिमला मिरीचीला पुणे मार्केटमध्ये मध्ये २००० ते ३५०० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी २७५० रुपयांचा दर मिळाला आहे. कालच्या तुलनेत आज ४०० ते ५०० रुपयांची वाढ पुणे मार्केट मध्ये पाहायला भेटली. रत्नगिरी मार्केटमध्ये शिमला मिरची साठी ३००० ते ४००० रुपयाचा दर मिळला असून सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळला आहे, आज रत्नगिरी मार्केट मध्ये २३ क्विंटल शिमला मिरचीची आवक झाली होती. नाशिक मार्केटमध्ये शिमला मिरचीसाठी २५०० ते ५६२५ रुपयांचा दर भेटला असून ४३७५ रुपयांचा दर भेटला आहे. नाशिक मार्केट मध्ये १३९ क्विंटल शिमला मिरचीची आवक झाली आहे.

भेंडी : पुणे मार्केटमध्ये भेंडीला १५०० ते ३००० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी दर २२५० रु चा भेटला आहे. पुणे मार्केट मध्ये २६६ क्विंटल भेंडीची आवक झाली होती.मुंबई मार्केटमध्ये ४०० क्विंटल भेंडी आली असून १५०० ते ३००० रुपयाच्या दरम्यान भेटला आहे. सरासरी २५०० आणि २००० रुपयांचा दर नंबर १ आणि नंबर २ वाणा साठी भेटला आहे. मुंबई मार्केट मध्ये चालू आठवड्यात भेंडीच्या दरात ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. औरंगाबाद मार्केट मध्ये ४० क्विंटल भेंडीची आवक झाली असून १२०० ते २००० रुपयाचा दर भेटला आहे तर १६०० रुपये सरासरी दर भेटला आहे.

शेवगा : आज राज्यातील वेगवेगळया मार्केटमध्ये शेवग्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत शेवग्याला ३५०० ते ४००० रुपयाचा दर भेटला असून सरासरी दर ३८०० रुपयाचा भेटला आहे. मुबंईत १५७ क्विंटल शेवगा विक्रीसाठी आलेले होता. तर सातारा मार्केटमध्ये ४५०० ते ५००० रुपयांचा दर भेटला असून ४५०० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. साताऱ्यात ५ क्विंटल शेवगा विक्रीसाठी. पुणे मार्केट मध्ये शेवग्याला २५०० ते ६००० रुपयांचा दर मिळला असून ४२५० चा सरासरी दर भेटला आहे. पुण्यात ५४ क्विंटल शेवग्याची आवक झाली होती.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App