बाजारभाव अपडेट २९ जुलै २०२० : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम: २९ जुलै २०२० : राज्यातील महत्वाच्या पिकांचे बाजारभाव खालील दिलेल्या चार्ट प्रमाणे कांदा : पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आज कालच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत किरकोळ घट झाली आहे. आज २७७९१ क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे (कालची आवक २९००० क्विंटल ) तर दर १५० ते १०११ रुपयाचा राहिला आहे. सरासरी दर ७५१ रुपयांचा भेटला आहे. पिंपळगाव मध्ये आज १० रुपयांची किरकोळ वाढ क्विंटल मागे झाली आह. लासलगाव मार्केट मध्ये आज २२३१४ क्विंटल कांद्याची आवक झालेली होती, तर दर ३०० ते ८९१ रुपायांच्या दरम्यान भेटला असून सरासरी दर ७०० रुपयाचा भेटला आहे. कालच्या तुलनेत आज दरामध्ये क्विंटल मागे ७०-८० रुपयाची वाढ झाली आहे. कळवन मार्केट मध्ये आज ५६०० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर ३०० ते ८९१ रुपयांच्या दरम्यान राहिलेला आहे. कळवंन मध्ये सरासरी दर ६७५ रुपयाचा भेटला आहे. उमराणे मार्केट : २७५०० क्विंटल आवक, दर ३०० ते ८५० रुपये, सरासरी दर ६७५ : मनमाड मार्केट: ७५०० क्विंटल, दर २०० ते ७०० रुपये, सरासरी दर ६२५ रुपये ; पुणे : आवक ५१३७ क्विंटल, दर ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर ७०० रुपये प्रति क्विंटल.

टोमॅटो : मुंबई मार्केट मध्ये आज २१४ नंबर १ वाणाची तर ८५७ क्विंटल नंबर २ वाणाची आवक झाली होती तर नंबर १ मालाला ३२०० ते ४००० रुपयांचा दर भेटला असून सरासरी ३६०० रुपयांचा दर भेटला आहे. नंबर २ वाणाला २००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान दर भेटला आहे. सरासरी २५०० रुपयांचा दर भेटला आहे. पुणे मार्केट मध्ये १२२२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून दर १००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. सरासरी दर १२५० रुपये राहिला आहे. कोल्हापूर : आज आवक ५४८ क्विंटल, दर १००० ते १५०० सरासरी दर १७५० रुपये , कोळपर मार्केट मध्ये आज ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटलची घट कालच्या तुलनेत पाहायला भेटली आहे; रत्नागिरी : आवक १८५ क्विंटल दर १००० ते २७०० रुपये सरासरी दर १५०० रुपये राहिला आहे. पंढरपूर मार्केट : १०८ क्विंटल आवक, दर ३०० ते २००० रुपये , सरासरी दर १५०० रुपये.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

कापूस : कापसाला यावल मार्केट मध्ये ४१२० ते ५०३० रुपयाचा दर भेटला असून सरासरी ४५५० रुपयांचा दर भेटला आहे. यावल मध्ये ४३ क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. (यावल मार्केट : २८ जुलै चे दर )

शेंगाव मार्केटमध्ये हायब्रीड कापसाचे ४९८ क्विंटल इतकी आवक झाली असून ५३५५ रुपयांचा दर भेटला आहे. सोनपेठ मार्केट मध्ये ४०२ क्विंटल मध्यम स्पेटल कापसाची आवक झाली असून ५१४० ते ५३४० रुपयांचा दर राहिला आहे. तर सरासरी दर ५१०० रुपयांचा दर भेटला आहे. नरखेड मध्ये ६४८ क्विंटल कापसाची आवक झाली असून ५००० ते ५३४० रुपयांचा दर भेटला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट-१२ ऑगस्ट २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

सोयाबीन : आज राज्यतील सोयाबीनच्या आवकेत आज कालच्या तुलनेत घट झाली आहे. सोयाबीनला राज्यभरात २७०० ते ३७५० रुपयाचा दर वेगवेगळ्या बाजरपेठेत,मिळाला आहे. वाशीम मालेगाव मार्केटमध्ये (आवक : २५५ क्विंटल ) सोयाबीनला ३५०० ते ३७५० रुपयाचा दर मिळाला असून ३६५० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे. कारंजा मार्केटमध्ये ३४२५ ते ३६५५ रुपयाचा दर मिळालं आहे. आज कारंजा मध्ये सोयाबीनची २४०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलेला होता. नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनला ३२०० ते ३७३० रुपयाचा दर भेटला असून सरासरी दर ३५०० रुपयाचा दर भेटला आहे. नागपूर मार्केट मध्ये ४२४ क्विंटल सोयाबीन विक्री साठी आलेला होता.

तूर: तुरीला कारंजा मार्केटमध्ये ५४७० ते ५७९५ रुपयाचा दर मिळाला असून, सरासरी दर ५६५० रुपयाचा भेटला आहे. तर ८२० क्विंटल तुरीची आवक झालेली होती. कारंजा मार्केट मध्ये आज तुरीच्या दरात ३० ते ३५ रुपयांची वाढ झाली आहे. वाशीम मार्केट मद्ये आज २१०० क्विंटल तुरीची आवक झाली आहे तर ५४०० ते ५८११ रुपयांचा दर भेटला आहे. बाभुळगाव मार्केट मध्ये आज ४०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ५३०१ ते ५७३० रुपयांचा दर भेटला आहे सरासरी ५५१५ रुपयांचा दर भेटला आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

मका:धुळे मार्केट मध्ये १०८६ क्विंटल मक्याची आवक झाली होती. तर दर १०६५ ते ११६२ रुपयाचा राहिला आहे. नामपूर मार्केटमध्ये आज ५०० क्विंटल मक्याची आवक झाली असून ९०० त ११५० रुपयाच्या दरम्यान दर भेटला आहे. सरासरी दर १०५० रुपयाचा मिळाला आहे. अमळनेर मार्केटमद्ये २०० क्विंटल मक्याची आवक झाली असून १०५० ते १२०० रुपयांचा दर राहिला आहे. सरासरी दर १२०० रुपये भेटला आहे. लासलगाव मार्केट मध्ये ३४० क्विंटल मक्याची आवक झाली असून १०५० ते १२२५ रुपयांचा दर भेटला आहे.

हळद : हळदी ला जिंतूर मार्केट मध्ये ४४५० ते ५४०० रुपयाचा दर भेटला आहे. सरासरी दर ५१५० रुपयाचा दर भेटला आहे तर ३१९ क्विंटल हळदीची विक्री झाली आहे. हिंगोली मार्केट मध्ये १००० क्विंटल हळदी ची आवक झाली असून ४५०० ते ५४०० रुपयाचा दर मिळाला आहे. सरासरी दर ४९०० रुपये भेटला आहे. भोकर मार्केटमध्ये १०३ क्विंटल हळदीची आवक झालेली होती तर दर ४१०० ते ५१०९ रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ४६०४ रुपये राहिला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App