बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम: २९ जून २०२० : आज आठवड्याच्या सुरवातीला राज्यातील महत्वाच्या पिकांचे बाजार भाव खालील प्रमाणे: आज टोमॅटो, तूर, हळदीच्या दरामध्ये सुधारणा झाली असून सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई राहिली आहे.

कांदा : राज्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत आज कांद्याच्या आवकेत आज शनिवारच्या तूलनेत वाढ झाली आहे लासलगाव मार्केटमध्ये आज कालच्या तुलनेत आवकेत वाढ झाली आहे तर बाजारभावात ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. १६००० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती, तर दर ४०० ते १०३५ रुपायांच्या दरम्यान भेटला असून सरासरी दर ८०० रुपयाचा भेटला आहे. पुणे मार्केटमध्ये आज २७७३ क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर ५०० ते ९५० रुपयांच्या दरम्यान राहिलेला आहे. सरासरी दर ७०० रुपयाचा भेटला आहे. आज पुणे मोशी मार्केट मध्ये १०० रुपयांची वाढ झाली आहे.

कोल्हापूर मार्केट : आज कोल्हापूर मार्केटमध्ये ४३९८ क्विंटल आवक झाली असून दर ३०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत, सरासरी दर ८०० रुपये दर भेटला आहे. सांगली मार्केट: सांगली मार्केटमध्ये १९५५ क्विंटल कांद्याची आवक झाली असून दर २०० ते १००० रुपये भेटला आहे, सरासरी दर ७०० रुपये भेटला आहे. पिंपळगाव बसवंत मार्केट : पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आवक २५२५१ क्विंटल राहिली असून, दर २०० ते ११३१ रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर ८७५ रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत. आज पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १०० ते १५० रुपयांची वाढ कांद्याच्या मार्केटमध्ये झाली आहे. मनमाड मार्केट मध्ये ६००० क्विंटल कांद्याची आवक झाली असून ३०० ते ८७७ रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर ८७५ रुपये भेटला आहे.

टोमॅटो : पुणे मार्केटमध्ये आज ६४७ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून दर १००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. सरासरी दर २१०० रुपये राहिला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी आणि आज टोमॅटोच्या दरात मोठी वाढ पुणे मार्केट मध्ये पाहायला भेटली आहे. कमाल भावात १००० रुपयांची वाढ झाली आहे. तर सरासरी भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई मार्केट मध्ये आज २४०० ते २८०० रुपयांचा दर नंबर १ वाणांसाठी भेटला असून १५०० आणि २००० चा दर नंबर २ च्या वाणांसाठी भेटला आहे. आज मुंबईत २२७ क्विंटल नंबर १ मालाची तर ९०६ क्विंटल नंबर २ मालाची आवक झाली होती.

कोल्हापूर मार्केट मध्ये १००० ते ३००० रुपयांच्या भाव भेटला असून सरासरी २००० रुपयांचा भाव भेटला आहे. तर आवक ६४७ क्विंटल राहिली आहे. आज कोल्हापूर मार्केट मध्ये ५०० रुपयांची वाढ क्विंटल मागे झाली आहे. रत्नागिरी मार्केटमध्ये १५०० ते ३००० रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर २००० रुपये भेटला आहे. रत्नागिरी मार्केट मध्ये २०८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून बाजारभावात ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

कापूस : कपाशीला राज्यात ५२५० ते ५३५५ रुपया पर्यंतचा दर वेगवेगळ्या बाजारपेठेत भेटला आहे. अकोला येथे ७४७ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर दर ५२५० ते ५३५५ रुपयांचा राहिला आहे. बोरगावमंजू मार्केटमध्ये कापसाला ५२५० ते ५३५५ रुपयाचा दर भेटला आहे.सरासरी दर ५३५० रुपयांचा भेटला आहे तर आवक १०४ क्विंटल राहिली आहे. बार्शी टाकळी मार्केट मध्ये ११२० क्विंटल कापसाची आवक झाली असून ५३५५ रुपयांचा दर भेटला आहे.

सोयाबीन : आज राज्यतील सोयाबीनच्या आवकेत घट झाली आहे. सोयाबीनला राज्यभरात २८०० ते ३९०० रुपयाचा वेगवेगळ्या बाजरपेठेत दर ,मिळाला आहे. वाशीम अनसिंग मार्केटमध्ये (आवक :१०० क्विंटल ) सोयाबीनला ३४५० ते ३७५० रुपयाचा दर मिळाला असून ३५०० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे. कारंजा मार्केटमध्ये ३५१५ ते ३७२० रुपयाचा दर मिळालं आहे. २७०० क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. नागपूर मार्केट मध्ये ११२७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ३२०० ते ३६५० रुपयांचा दर भेटला असून सर ३५०० रुपयांचा सरासरी दर राहिला आहे.

तूर: तुरीला वाशीम अनसिंग मार्केटमध्ये ५६५० ते ६१५० रुपयाचा दर मिळाला असून, सरासरी दर ६००० रुपयाचा भेटला आहे. वाशीम अनसिंग मार्केटमध्ये ६० क्विंटल तुरीची आवक झालेली होती वाशीम अनसिंग मद्ये आज २००-३०० रुपयांची वाढ गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाहायला भेटली आहे. कारंजा मार्केटमध्ये (आवक २२५०) सुद्धा तुरीचे बाजारभाव ५६०० ते ६०५५ रुपयाचा दरम्यान राहिले असून सरासरी दर ५८३० रु चा दर भेटला आहे. अकोला मार्केट मध्ये ४९०० ते ५९०० सरासरी दर ५८०० भेटला आहे, आवक ८६८ क्विंटल राहिली आहे. वाशीम मार्केट मध्ये २००० क्विंटल तुरीची आवक झाली असून ५७०० ते ६१०० रुपयांचा दर भेटला आहे. राज्यातील तुरीच्या बाजारात आज चांगली वाढ झाली असून हंगामातील दर पहिल्यांदाच ६१०० रुपयांच्या वर गेला आहे.

( जिंतूर मार्केटमध्ये ५१४५ ते ५९४५ रुपयाचा दर भेटला आहे. सरासरी दर ५३०० रुपयाचा भेटला आहे तर १७८ क्विंटल आवक राहिली आहे. नांदेड मार्केटमध्ये हळदी ला ४००० ते ६४०० रुपयांचा दर भेटला आहे,सरासरी दर ५४०० रुपये भेटला आहे.तर आवक २०६१ क्विंटल आवक राहिली आहे. सांगली मार्केट मध्ये ३७८१ क्विंटल आवक राहिली असून ४००० ते ९००० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ६५०० रुपये दर भेटला होती रविवार चा बाजारभाव -२८ जून २०२०)

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App