बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम: १ जुलै २०२० आज महिन्याच्या सुरवातीला राज्यातील महत्वाच्या पिकांचे बाजारभाव खालील दिलेल्या चार्ट प्रमाणे, आज सोयाबीन, कांदा, मका, यांच्या दरात नरमाई राहिली तर तूर,टोमॅटो, कापूस आणि हळदी चे दर स्थिर राहिले आहेत.

कांदा : राज्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत आज कांद्याच्या आवकेत आज कालच्या तुलनेत घट झाली आहे. पिंपळगाव बसवंत मार्केट : पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आवक १५४२० क्विंटल राहिली असून, दर २०० ते १०५१ रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर ८२५ रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत. आज पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये ५० ते ६०रुपयांची घट झाली आहे. पुणे मार्केटमध्ये आज ३३२२ क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर ४०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान राहिलेला आहे. सरासरी दर ६५० रुपयाचा भेटला आहे. आज पुणे मोशी मार्केट मध्ये ५० रुपयांची घट झाली आहे.

कोल्हापूर मार्केट : आज कोल्हापूर मार्केटमध्ये १८५४ क्विंटल आवक झाली असून दर ३०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत, सरासरी दर ८०० रुपये दर भेटला आहे. उमराणे मार्केट मध्ये १५५५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून दर ३०० ते ९०० रुपये भेटला आहे, सरासरी दर ७०० रुपये भेटला आहे. मनमाड मार्केट मध्ये ३६०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून २५० ते ८१४ रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर ६७५ रुपये भेटला आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

टोमॅटो : पुणे मार्केटमध्ये आज ९५९क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून दर १५०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. सरासरी दर २००० रुपये राहिला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी आणि आज टोमॅटोच्या दरात ५०० रुपयांची घट झाली आहे. मुंबई मार्केट मध्ये आज १५०० ते ३००० रुपयांचा दर नंबर १ वाणांसाठी भेटला असून १५०० ते २००० चा दर नंबर २ च्या वाणांसाठी भेटला आहे. आज मुंबईत २०८ क्विंटल नंबर १ मालाची तर ८०६ क्विंटल नंबर २ मालाची आवक झाली होती.

कोल्हापूर मार्केट मध्ये १००० ते ३००० रुपयांच्या भाव भेटला असून सरासरी २००० रुपयांचा भाव भेटला आहे. तर आवक ७३०क्विंटल राहिली आहे.रत्नागिरी मार्केटमध्ये २००० ते ३५०० रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर २८०० रुपये भेटला आहे. रत्नागिरी मार्केट मध्ये २२० क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून बाजारभावात ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

कापूस : कपाशीला राज्यात ५१०० ते ५३५५ रुपया पर्यंतचा दर वेगवेगळ्या बाजारपेठेत भेटला आहे. पुलगाव मार्केट मध्ये २६५७ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर दर ४६५० ते ५३५५ रुपयांचा राहिला आहे. किल्ले धारूर मार्केट मध्ये कापसाला ५१०० ते ५१५० रुपयाचा दर भेटला आहे.सरासरी दर ५१४९ रुपयांचा भेटला आहे तर आवक ६५९ क्विंटल राहिली आहे. शेगाव मार्केट मध्ये६०० क्विंटल कापसाची आवक झाली असून ५३५५ रुपयांचा दर भेटला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट-१२ ऑगस्ट २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

सोयाबीन : आज राज्यतील सोयाबीनच्या आवकेत घट झाली आहे. सोयाबीनला राज्यभरात २८०० ते ३९०० रुपयाचा वेगवेगळ्या बाजरपेठेत दर ,मिळाला आहे. वाशीम अनसिंग मार्केटमध्ये (आवक :१०० क्विंटल ) सोयाबीनला ३४५० ते ३७५० रुपयाचा दर मिळाला असून ३५०० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे. कारंजा मार्केटमध्ये ३५१५ ते ३७२० रुपयाचा दर मिळालं आहे. २७०० क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. नागपूर मार्केट मध्ये ११२७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ३२०० ते ३६५० रुपयांचा दर भेटला असून सर ३५०० रुपयांचा सरासरी दर राहिला आहे.

तूर: तुरीला मोर्शी मार्केट मध्ये ५५०० ते ५८०० रुपयाचा दर मिळाला असून, सरासरी दर ५६५० रुपयाचा भेटला आहे. हिंगोली खाणेगाव मार्केट मध्ये १०८ (आवक १०८) सुद्धा तुरीचे बाजारभाव ५६०० ते ५८०० रुपयाचा दरम्यान राहिले असून सरासरी दर ५७०० रु चा दर भेटला आहे. सावनेर मार्केट मध्ये ५५०० ते ५८०० सरासरी दर ५७०० भेटला आहे, आवक २१५ क्विंटल राहिली आहे. धुधनी मार्केट मध्ये १८२ क्विंटल तुरीची आवक झाली असून ५१८० ते ५९५० रुपयांचा दर भेटला आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

मका: यावल मार्केटमध्ये २०७६ क्विंटल मक्याची आवक झाली होती. तर दर ९९० ते १४१० रुपयाचा राहिला आहे. सरासरी दर १३१५ रुपयाचा भेटला आहे. नामपूर मार्केटमध्ये मक्याला ९००ते १३५०रुपयांचा दर मिळला आहे. सरासरी दर ११५० रुपयांचा राहिला आहे. तर १८० क्विंटल मक्याची आवक झाली होती. नामपूर मार्केट मध्ये आज ३० ते ४० रुपयांची घसरण झाली आहे.

हळद : हळदी ला काल नांदेड मार्केट मध्ये ४००० ते ६३९५ रुपयांचा दर भेटला असून सरासरी ५३०० रुपयांचा दर भेटला आहे. नांदेड मध्ये २२५४ क्विंटल हळदी ची आवक झाली होती. हिंगोली मार्केट मध्ये १६५० क्विंटल आवक झाली असून ४८०० ते ५८०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ५३०० रुपयांचा भेटला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App