बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव!

Smiley face 4 min

ई-ग्राम: २६ जून २०२० : आज शुक्रवार, राज्यातील महत्वाच्या पिकांचे बाजार भाव खालील प्रमाणे: आज टोमॅटो, तूर, हळद आणि बटाट्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई राहिली आहे.

कांदा : राज्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत आज कांद्याच्या आवकेत आज घट झाली आहे लासलगाव मार्केटमध्ये आज ११२०० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती, तर दर ४०० ते १००० रुपायांच्या दरम्यान भेटला असून सरासरी दर ८०० रुपयाचा भेटला आहे. आज लासलगाव मार्केटमध्ये कालच्या तुलनेत सरासरी बाजारभावमध्ये ५० ते ६० रुपयांची घट झाली आहे . पुणे मार्केटमध्ये आज ४१२३ क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर ४०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान राहिलेला आहे. सरासरी दर ६०० रुपयाचा भेटला आहे. आज पुणे मार्केट मध्ये १०० रुपयांची घसरण झाली आहे.

येवला मार्केट : आज येवला मार्केटमध्ये ९००० क्विंटल आवक झाली असून दर ३०० ते ८३५ रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत, सरासरी दर ६७५ रुपये दर भेटला आहे. सांगली मार्केट: सांगली मार्केटमध्ये ३३१५ क्विंटल कांद्याची आवक झाली असून दर ३०० ते १००० रुपये भेटला आहे, सरासरी दर ६५० रुपये भेटला आहे.सांगली मार्केट मध्ये ५० रुपयांची घट आई आहे. कळवन मार्केट : कळवण मार्केटमध्ये आवक ६१०० क्विंटल राहिली असून, दर ३५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर ७२५ रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत. आज कळवन मार्केट मध्ये १०० रुपयांची घट कांद्याच्या मार्केटमध्ये झाली आहे. मनमाड मार्केट मध्ये ३२०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून ३०० ते ८६० रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर ७०० रुपये भेटला आहे. राहता : आवक: ४११२ दर १०० ते ९०० सरासरी दर ६००; देवळा : ४२५०, दर ५०० ते ९०० सरासरी दर ६००.

कांद्याचे देशभरातील बाजारभाव : देशातील कांद्याच्या दरामध्ये गुजरात मधील महुवा मार्केट ०.६१ टक्क्यांची वाढ होऊन क्विंटल मागे १६६० रुपयांवर पोचले आहेत.

टोमॅटो : पुणे मार्केटमध्ये आज १०८७ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून दर १२०० ते २००० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. सरासरी दर १६०० रुपये राहिला आहे. कालच्या तुलनेत आज टोमॅटोच्या दरात आज ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई मार्केट मध्ये आज २४०० ते २८०० रुपयांचा दर नंबर १ वाणांसाठी भेटला असून १५०० आणि २००० चा दर नंबर २ च्या वाणांसाठी भेटला आहे. आज मुंबईत २६० क्विंटल नंबर १ मालाची तर ८०९ क्विंटल नंबर २ मालाची आवक झाली होती.

पनवेल मार्केटमध्ये टोमॅटोच्या आवेकेत घट झाली असून टोमॅटोचे दर २८०० ते ३२०० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. तर ४२३ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. आज पनवेल मार्केटमध्ये बाजारभावामध्ये ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इस्लामपूर आज इस्लामपूर मार्केटमध्ये ११४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून, दर १००० ते २३०० सरासरी दर २२०० रुपये भेटला आहे. चंद्रपूर-गंजवाड मार्केट मध्ये १६०० ते २००० रुपयांच्या भाव भेटला असून सरासरी १८०० रुपयांचा भाव भेटला आहे. तर आवक २७८ क्विंटल राहिली आहे. रत्नागिरी मार्केटमध्ये १००० ते २००० रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर १५०० रुपये भेटला आहे.

देशातील टोमॅटो बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे : देशातील टोमॅटोचे प्रमख उत्पादक मार्केट असलेल्या कोलार (कर्नाटक )आणि वधवाण (गुजरात ) मार्केटमध्ये आज टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

कापूस : कपाशीला राज्यात ५२५० ते ५३५५ रुपयाचा दर मिळाला आहे. अकोला येथे ६५३ क्विंटल कापसाची आवक झाली होती, तर दर ५२५० ते ५३५५ रुपयांचा राहिला आहे. अकोला मार्केटमध्ये कापसाला सरासरी ५३५० रुपयाचा दर भेटला आहे. किल्ले धारूर मार्केटमध्ये २८८ क्विंटल कापसाची आवक झाली असून ५१०० ते ५१४९ रुपयांचा दर भेटला आहे.

सोयाबीन :सोयाबीनला राज्यभरात २८५० ते ४२०० रुपयाचा दर वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळाला आहे. आज कारंजा मार्केटमध्ये सोयाबीनच्या दारात ५ ते १० रुपयांची घट झाली आहे. कारंजा मार्केटमध्ये (आवक :२३०० क्विंटल) सोयाबीनला ३५२० ते ३७०५ रुपयांचा दर मिळाला असून ३६०० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे. अकोला मार्केटमध्ये आज ३४५० ते ३६७५ रुपयाचा दर भेटला असून ३६२५ रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. अकोल्यात १५०९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. अकोला मार्केट मध्ये आह ४०-५० रुपयांची घट झाली आहे.

चिखली मार्केटमध्ये ५७५ क्विंटल आवक झाली असून ३३८० ते ३५६५ रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ३४७५ रुपये राहिला आहे. यवतमाळ मार्केटमध्ये ४२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून दर ३१७५ ते ३६७५ रुपयांचा दर भेटला आहे. केज मार्केटमध्ये आज १५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून दर ३३०० ते ३६०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ३४०० रुपयांचा दर भेटला आहे.

तूर : आज राज्यात तुरी साठी ४६०० ते ५८६५ रुपयां पर्यंतचा बाजारभाव प्रतवारी नुसार मिळाला आहे. तुरीला कारंजा मार्केटमध्ये ४९७४ ते ५८०० रुपयाचा दर मिळाला असून, सरासरी ५४५० रुपयाचा दर भेटला आहे. कारंजा मार्केटमध्ये २०५० क्विंटल तुरीची आवक झालेली होती.

वाशीम मार्केटमध्ये आज तुरीच्या दरात नरमाई आली आहे. आज वाशीम मध्ये २१०० क्विंटल तुरीची आवक झाली असून दर ४००० ते ४३७० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ४१०० रूपये राहिला आहे. अकोला मार्केटमध्ये ८६२ क्विंटल तुरीची आवक झाली असून ५००० ते ५७५० रुपये प्रति क्विंटल चा द भेटला आहे. यवतमाळ मार्केट मध्ये २४५ क्विंटल तुरीची आवक झाली असून ५३५० ते ५८६५ रुपयांचा दर भेटला आहे.

मका: धुळे मार्केटमध्ये आज १०५१ ते १४९१ रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर १२९० रुपयांचा भेटला असून धुळे १६९० क्विंटल मका मार्केटमध्ये दाखल झालेली होती. दोंडाईचा मार्केट मध्ये ३२३ क्विंटल मक्याची आवक झाली असून ११२० ते १३०० रुपयांचा दर भेटला आहे.

बटाटा : आज राज्यात बटाट्यासाठी १२०० ते २२०० रुपयांचा दर भेटला आहे. सोलापूर मार्केटमध्ये ३०० क्विंटल बटाट्याची आवक झाली असून १२०० ते २१०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर १६०० रुपये राहिला आहे. मुंबई मार्केट मध्ये आज बटाट्याच्या आवकेत वाढ झाली असून ६८३२ क्विंटल आवक झाली असून १५०० ते २१०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर १८०० रुपये राहिला आहे. आज मुंबई मार्केट मध्ये १०० रुपयांची घट कालच्या तुलनेत आली आहे. पुणे मार्केट मध्ये १३९४ क्विंटल बटाट्याची आवक झाली असून १६०० ते २२०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर १८५० रुपये भेटला आहे.

हळद: सांगली मार्केटमध्ये आज ३९९१ क्विंटल हळदीची आवक झाली असून ४००० ते १०७०० रुपयांचा दर भेटला आहे तर ७३५०. रिसोड मार्केट मध्ये काल (२५ जून विक्री ) ५४०० क्विंटल आवक राहिली असून ४८०० ते ५९०० रुपयांचा दर भेटला आहे. रिसोड मध्ये ५४५० रुपयांचा सरासरी दर मिळला आहे. बसमत मार्केटमध्ये काल (२५ जूनची विक्री ) ४९०८ क्विंटल हळदी ची आवक झाली असून ४८३१ ते ७७०९ रुपये प्रति क्विंटलचा दर भेटला आहे. सरासरी दर ५६५५ रुपये भेटला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App