दूध भुकटी योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

शासनाने एप्रिल 2020 पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी 10 लाख लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना सुरु केली. सुरुवातीला ही योजना एप्रिल व मे या 2 महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसल्याने 8 जुलैच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेस १ महिन्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाचा:  ऐकलं का! १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज; ३३ टक्के अनुदानही मिळणार

या 1 महिन्याच्या वाढीव कालावधीत सरासरी प्रतिदिन 5 लाख 14 हजार लिटर या प्रमाणे 1 कोटी 60 लाख लिटर दुधाचे रुपांतरण भुकटीत केले जाणार आहे. त्यासाठी ५१ कोटी २२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्विकृत केले जाणार असून त्यापोटी 190 कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे.

वाचा:  ९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’

केंद्राने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन घेाषित केला होता. राज्यानेही 19 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊनमध्ये बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण 17 लाख लिटरने कमी झाली आहे.

वाचा:  दूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची मागणी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App