उत्तर भारतात मॉन्सून पुढे सरकेना; हवामानात बदल

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम :  मॉन्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अजूनही पुढे सरकलेले नाहीत. त्यामुळे राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना आणि दिल्ली भागांत अजूनही मॉन्सून दाखल झालेला नाही. येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर प्रदेशाच्या काही भागांत पोषक वातावरण झाल्यानंतर मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

वाचा:  “प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा, थोबाड आणि गाल रंगवू शकतो”

उत्तर भारतात वेगाने मजल मारलेला मॉन्सून मागील तीन दिवसांपासून रेंगाळलेला आहे. रविवारपासून मॉन्सून दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरच्या भागांतच आहे. बुधवारी उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र होते. हे क्षेत्र बिहारच्या दिशेने सरकत असून, उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनचा प्रवास काहीसा मंदावला आहे.

egram
वाचा:  ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ मोहिमेला मोठा प्रतिसाद; दुग्धविकासमंत्री, मुख्यमंत्र्यांनाही पाठविली हजारो पत्रे

दोन दिवसांपासून राजस्थानचा वायव्य भाग ते बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग या दरम्यान असलेल्या पंजाब ते दक्षिण आसाम, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच पंजाब व परिसरात, राजस्थानाचा वायव्य भाग आणि हरियाना परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनमध्ये तीन ते चार दिवसांपासून प्रगती झालेली नाही.

वाचा:  पीक पेरा नोंदणीला प्रतिसाद कमीच
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App