मॉन्सून विदर्भात दाखल ; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही प्रगती

Smiley face < 1 min

ई ग्राम : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी (ता. ११) महाराष्ट्रात दाखल झाले. शुक्रवारी (ता. १२) सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत मॉन्सूनने विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. मॉन्सूनने बारामती, बीड, वर्ध्यापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उद्यापर्यंत (ता. १४) मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात पुढील 24 तासांत वाढणार पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरुवारी (ता. ११) मोठी मजल मारणारा मॉन्सून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील हर्णे बंदर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत पोचला होता. तसेच, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, दक्षिण ओडीशा, बंगालच्या उपसागरातही प्रगती केली होती. शुक्रवारी मॉन्सून ईशान्य भारतातील सर्व राज्य व्यापून, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, छत्तीसगच्या बहुतांशी भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

वाचा:  कोकणात जोरदार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर राजस्थानपासून या कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रीय आहे. उद्यापर्यंत (ता. १४) महाराष्ट्र, ओडीशा, पश्‍चिम बंगालचा संपूर्ण भाग, मध्य अरबी समुद्र, छत्तीसगडचा आणखी काही भाग, गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

वाचा:  राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App