मान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती

Smiley face < 1 min

पुणे : मान्सूनचा प्रवास वेगाने होत असल्याने राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. तसंच पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होत आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात वातावरणात झपाट्याने बदल होणार आहेत. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. रविवारी (ता.२३) विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

वाचा:  चिपळूणमध्ये जलप्रलय! पूरात अडकलेल्या दीड हजार जणांना बाहेर काढले

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी हा चटका चांगलाच जाणवत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. मात्र, दुपारनंतर अचानक भरून येत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे कमाल तापमान कमीअधिक होत आहे.

मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने तुरळक ठिकाणी कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.

वाचा:  रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची कसरत सुरु

दरम्यान, मराठवाड्यातही उन्हाचा चटका कमी झाल्याने कमाल तापमान ३७ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील बहुतांशी भागात कमाल तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे या भागांत पुन्हा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. विदर्भात ३९ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.

वाचा:  कोल्हापुरात पाटबंधारे विभागाचा अंदाज चुकला

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
सोमवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक
मंगळवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा
बुधवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
गुरुवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App