अजित पवार, सुनिल तटकरेंसह ‘या’ नेत्यांना मुंबई पोलिसांची नोटीस

Smiley face < 1 min

मुंबई – तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलनात जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत उमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनिल तटकरे आणि सचिन अहिर यांच्यासह ११ नेत्यांना ३१ ऑगस्टला न्यायलयात हजर राहण्यास पोलिसांनी सांगितले आहे.

या सर्व नेत्यांनी २०१८ मध्ये तत्कालीन सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून या सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या नेत्यांना नोटीस बजावली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. त्याची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्टला कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

वाचा:  यंदा खरीप हंगामात विक्रमी लागवड; उत्पादनात होणार बंपर वाढ

दरम्यान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून वाहतुकीस या सर्वांनी अडथळा केला होता. त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असे, कृत्य केले म्हणून त्यांच्याविरुद्ध (३७)१ सह १३५ मपोका यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील तीन मंत्र्यांसह अशोक धात्रक, सचिन अहिर, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे, सोहेल सुभेदार यांच्याविरुद्धही हा गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा:  या उपक्रमामुळे 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला फायदा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App