नाबार्डकडून ४ हजार कोटींच्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पांना मान्यता

Smiley face < 1 min

मुंबई – नॅशनल बँक फॉर अ‌ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डने आत्तापर्यंत देशातील एकूण सूक्ष्म सिंचन प्रकल्पांसाठी ३ हजार ८०६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री
नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. या निधीमुळे १२.५ लाख हेक्टर सूक्ष्म सिंचनाखाली येणार आहे.

अर्थीक वर्ष २०१९-२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन निधीतून ही रक्कम देण्यात येईल. नाबार्डकडे ५ हजार कोटी रुपये इतका एकूण निधी उपलब्ध आहे. राज्यांना सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवयाचे असल्यास या निधीतून मदत देण्यात येईल. राज्य सरकारांना या निधीतून दिलेल्या कर्जावर लागणाऱ्या व्याजावर सवलत दिली जाते.

वाचा:  राज्य सरकार मुक्त विद्यापीठात सुरु करणार कृषीविषयक अभ्यासक्रम

या निधीतून कर्ज घेतल्यास राज्य सरकारांना पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या ‘पर ड्रॉप मोर क्रॉप’ या उपयोजनेचा अतिरिक्त फायदा घेता येतो. या उपयोजनेकरीता २०२०-२१ अर्थीक वर्षासाठी ४ हजार कोटी रुपये जाहीर केले होते. जास्तीजास्त राज्य सरकारांनी या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन तोमर यांनी केले आहे.

येत्या ५ वर्षात १०० लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. ही योजना केंद्र सरकार २०१५-१६ पासून राबवत आहे. गेल्या पाच वर्षात या योजनेमार्फत ४७.५ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले होते. सूक्ष्म सिंचनाने पाण्याचा अपव्यय होत नाही तर त्याचा पिकांना फायदा होतो. तसेच उत्पादकताही वाढते, असे तोमर म्हणाले. त्याचप्रमाणे जमीन सुपीक होऊन निविष्ठांचा खर्चही कमी होतो.

वाचा:  कृषी विधेयकाविरोधात ३१ शेतकरी संघटनांनी पुकारला बंद

दरम्यान, कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातल्यात्यात शेतीक्षेत्राला तर कोरोनामुळे खूपच मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नाबार्ड शेतकऱ्यांना चालू वर्षात १.२० लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App