नागपूर – विधान सभेचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार विधानसभेतील आमदारांना आहे. त्याची चिंता राज्यपालांना करायची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी १२ विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्त करण्यासाठी आधी लक्ष घालावे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारला.
भंडारा येथे जाताना नाना पटोले यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार या राज्यपालांच्या प्रश्नावर विचारणा केली असता. ते म्हणाले की, बारा आमदारांची नियुक्ती कधी करणार हे त्यांनी सांगावे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत. त्यांनी राजभवनाला राजकीय पक्षाचे कार्यालय केले आहे. त्यांची भूमिका संपूर्ण राज्याला माहित आहे. बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत ते बोलत नाही.
विधानसभेचा अध्यक्ष अधिवेशनात मतदानाने निवडण्यात येतो. त्यामुळे तो केव्हा निवडणार हा प्रश्नच उद्भवत नाही. अधिवेशन होईल तेव्हा अध्यक्षही निवडला जाईल. याची चिंता राज्यपालांना करण्याचे कारण नाही. बारा सदस्यांची निवड केली जात नसल्याने काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचे काय झाले अशी विचारणा केली असताना पटोले यांनी कुठल्या नियमात न्यायालयात जाता येईल हे तपासल्या जात आहे.
दरम्यान, कायदेतज्ज्ञांचे मत याकरिता घेण्यात येत आहे. पूजा राठोड प्रकरणी जोपर्यंत सत्यता समोर येत ना तोपर्यंत अधिक बोलणे योग्य नाही. भाजपलाच याची जास्त घाई झाल्याचे दिसून येते.
सुशांत सिंग प्रकरणी भाजपचा नेता?
सुशांत सिंग प्रकरणी भाजपने असेच आकांडतांडव केले होते. सीबीआय चौकशी लावली होती. मात्र हाती काहीच लागले नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्याच एक मोठ्या नेत्याचे नाव पुढे येत असल्याने आता ते गप्प बसले असल्याचेही पटोले म्हणाले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.