या पार्टी ने दिले सर्व आमदारांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी !

ई ग्राम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन कोरोना संसर्गजन्य महामारीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी देण्यात येणार असून याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस चे अद्यक्ष श्री शरद पवार यांनी केल्या आहेत.

यामध्ये त्यांनी एक पत्रक काढले असून या मध्ये म्हंटले आहे कि – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारी संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून, शेती व उद्योग धंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. त्या अभुतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य य केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य याचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्याचे एक महिन्यांचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की,सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव पाटील जमा करावेत.

Read Previous

जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकाने याबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

Read Next

गर्दी ‘करोना’; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार