मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून या बैठकीनंतर सविस्तर माहिती समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. हे नियम काय असतील त्याबाबत गाईडलाईन्स आजच घोषित होण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त रूग्ण नव्याने दररोज आढळून येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी साधलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं होतं.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.