आता बटाटा लागवड झाली सोपी; महिंद्रा कंपनीने आणले अनोखे यंत्र

Smiley face 2 min

नवी दिल्ली – कृषी क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. या क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होत आहे. तसेच शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे. बटाट्याची लागवड जलद गतीने करण्यासाठी मंहिद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक मशीन बनवली असून बुधवारी (९ सप्टेंबर) तिचे अनावरण करण्यात आले. या मशीनचे नाव प्लांटिंगमास्टर पोटॅटो असे ठेवले आले आहे.

प्लांटिंगमास्टर पोटॅटो ही मशीन भारतीय कृषीच्या परिस्थितीनुसार बनवण्यात आली आहे. जी अधिक उत्पन्न आणि उच्च गुणवत्तेसाठी मदत करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. युरोपमधील डेवुल या कंपनीसोबत मिळून मंहिद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने ही मशीन तयार केली आहे. महिंद्रा आणि डेवुल्फने मागील वर्षी पंजाबमधील प्रगतीशील शेतकऱ्यांसोबत मिळून बटाटे लागवडीच्या तंत्रावर काम केले होते. बटाटे उत्पन्नात २० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, बटाटे लागवड करण्याची मशीन ही भाडे तत्वावरही उपलब्ध आहे. या मशीनला खरेदीसाठी सहज सोप्या पद्धतीने वित्तपुरवठा केला जाणार आहे. प्लांटिगमास्टर मशीनची विक्रीसाठी पंजाबमध्ये उपलब्ध आहे. तर उत्तर प्रदेशात विक्री आणि भाडोत्री उपलब्ध असेल. गुजरातमध्येही ही मशीन भाडोत्री पद्धतीवर उपलब्ध असेल.

वाचा:  राज्य सरकार मुक्त विद्यापीठात सुरु करणार कृषीविषयक अभ्यासक्रम

शेतीचे यांत्रिकीकरण हा विषय एका दशकापूर्वी गौण समजला जात होता. परंतू, मागील काही वर्षांत मजुरांची कमतरता तिव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली आणि यांत्रिकीकरण हा विषय चर्चेत आला. विकसित देशांमध्ये यांत्रिकीकरण हाच शेतींचा महत्वाचा घटक आहे. त्याशिवाय तिथे शेती अशक्य आहे. हीच परिस्थिती आपल्याकडे हळूह्ळू येत आहे.

ही वस्तुस्थिती आता सर्वांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी यांत्रिकी उपअभियान हे राष्ट्रीय कृषि विस्तार अभियानाचा एक प्रमुख भाग म्हणून राबविण्यात येत आहे. या उपअभियानांतर्गत नवीन कृषी आणि यंत्रे अवजारे यांचा प्रसार तसेच त्यासाठी भरपूर अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणामुळे मजुरांची कमतरता भरून काढली जाते.

वाचा:  शेतकऱ्यांचा विरोध असलेलं कृषी विधेयक नेमकं आहे काय; जाणून घ्या

कृषी अवजारांची मागणी आणि पुरवठा यंत्र-अवजारांची गरजेनुसार उपलब्धता तसेच मागणी व पुरवठा यामध्ये तारतम्य राखण्यासाठी भविष्यात कृषी यांत्रिकीकरण हा विषय मुख्य प्रवाहात आणि उच्चतम प्राथमिकतेत आणावा लागेल. भविष्यात भेडसावणारे अन्न सुरक्षेचे संकट, पूरक धोरणाअभावी शेती क्षेत्राची होत असलेली दुर्दशा आणि त्याचे सामाजिक परिणाम, शेतीचे घटते क्षेत्र, हवामान बदलाचे अनिष्ट परिणाम, शेतीतून बिघडत्या अर्थशास्त्रामुळे त्रस्त झालेला शेतकरी, शेतीत कष्टाचे काम करण्यासाठी मनुष्यबळाची अनुपलब्धता इत्यादी सर्व विषय राष्ट्रीय आणि महत्वाचे आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कृषी हे देशाचे सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे.

वाचा:  कंगना पुन्हा बरळली; शेतकऱ्यांना म्हणाली दहशतवादी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App