कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर!

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दि

वाचा:  ठाकरे सरकार सप्टेंबरपर्यंत कोसळणार; नारायण राणे यांचा दावा

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

वाचा:  कर्जमाफीसाठी थेट कारागृहात जाउन आधार प्रमाणीकरण, सहकारी बँकेची कौतुकास्पद कामगिरी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App