मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती; उद्या ‘या’ राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता

Smiley face < 1 min

पुणे :  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील राज्यांमधील वाटचाल काहीशी रेंगाळली आहे. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील वाटचाल सहा दिवसांपासून,  तर गुजरातमधील मॉन्सूनची वाटचाल आठवडाभरापासून जैसे थे आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान होत असल्याने उद्यापर्यंत (ता.२३) मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह उत्तराखंड राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा:  ‘बुद्धांच्या विचाराने आव्हानांवर मात’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. यातच उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने पूर्वेकडून वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे आजपासून पूर्व आणि मध्य भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडणार आहेत.

वाचा:  मुंबई आणि कोकणात आजही मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याचा इशारा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App