‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’

Smiley face < 1 min

नाशिक : मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यामुळे खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. तर शिवराज्यभिषेक दिनी रायगडकडे कूच करा, असा आदेश संभाजीराजेंनी शिवभक्तांना दिला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हाबंदीचा नियम लागू आहे, तरी मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असंही संभाजीराजे यांनी शिवभक्तांना सांगितले आहे.  

वाचा:  अखेर उजनी धरण प्लसमध्ये; जाणून घ्या टक्केवारी

खासदार संभाजीराजे सोमवारी (दि.३१) मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले.

संभाजीराजेंनी शिवभक्तांना आणि कार्यकर्त्यांना शिवराज्यभिषेक दिनी बोलावल्यामुळे ६ जूनला संभाजीराजे नेमकी कोणती घोषणा करणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी २ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

वाचा:  मत्स्यपालनाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

दरम्यान, मराठा आरक्षणाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे संभाजीराजे छत्रपती लोकांशी जोडले गेले आहेत. ही गोष्ट म्हणजे रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. तब्बल १५ वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. या सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी येतात. गेल्यावर्षी हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा या सोहळ्याला गर्दी होण्याची शक्यता आहे.

वाचा:  बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी ‘या’ तारखेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App