कांदा दरात सातत्याने चढउतार सुरु; पाहा बाजारभाव

Smiley face < 1 min

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कांदा दरात चढउतार सुरु आहे. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत कांद्याला ५०० ते २ हजार ४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. त्याआधी आठ दिवसांपुर्वी हा दर ५०० ते ३ हजार ३०० रुपयांवर दर पोहचला होता. आवक कमी-जास्त होत आहे.

नगर जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र अधिक आहे. रब्बीत लवकर लागवड केलेला कांदा काढणी केला जात आहे. त्यामुळे बाजारात कांदयाची आवक होत आहे. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून कांद्याची नगरला आवक होत असल्याने आवकेत सतत कमी जास्त होत आहे.

egram

शनिवारी (ता.६) नगरला २६ हजार ५१४ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते २४०० व सरासरी दोन हजाराचा दर होता. ४ मार्चला ३०० ते २४०० रुपयांचा दर मिळाला तर २८ हजार ३१३ क्विंटलची आवक झाली. १ मार्चला २१ हजार ६१६ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते ३३०० रुपयांचा दर होता. २७ फेब्रुवारीला ३२ हजार ५२२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २४०० रुपयांचा दर मिळाला.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसात कांदा दरात सातत्याने चढउतार होत आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले. राहाता, राहुरी, श्रीरामपुर, कोपरगाव, पारनेर बाजार समितीतही असे दर होते.

नगरमध्ये मिळत असलेला कांद्याचा दर
१ नंबर कांदा – २००० ते २४००
२ नंबर कांदा – १२०० ते २०००
३ नंबर कांदा – ७०० ते १२००
४ नंबर कांदा – ५०० ते ७००

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App