कांद्याच्या दरात चढ-उतार सुरुच; प्रतवारीनुसार मिळतोय भाव

Smiley face < 1 min

नाशिक – दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी (७ नोव्हे.) कांदा दर काहीसे कमी होते. मात्र, सोमवारी (९ नोव्हे.) जिल्ह्यात सरासरी ५०० रुपयांपर्यंत दरात वाढ झाली. परंतू, मंगळवारी (१० नोव्हे.) दरात पुन्हा किंचित घसरण झाली. त्यामुळे बाजारात चढ-उतार सुरुच आहेत.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा बाजार आवारातील कामकाज बुधवारपासून (११ नोव्हे.) बंद होत आहे. व्यवहार पुढील ८ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला शिल्लक उन्हाळ कांदा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. मात्र सोमवारी दरात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी आवक वाढतीच असल्याने दरात पुन्हा काही अंशी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

वाचा:  केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे - हंसराज अहीर

अगोदर कांदा बाजारभावात तेजी आल्यानंतर निर्यातबंदी अन् साठवणूक मर्यादा निर्णयाचा अधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात कांदा आयातीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काही अंशी जिल्ह्यात कांद्याचे दर घसरले. त्यामुळे दर वाढले तरी शेतकऱ्यांसाठी ते दिलासा देणारे ठरलेले नाहीत, कारण नुकसान अधिक झालेले आहे. तर अधिक कांदा उत्पादन खर्चाच्या खाली विकला गेला आहे. मात्र, मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात दरात मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

वाचा:  ‘वेळेत पीक कर्ज फेडणाऱ्यांना परतावा’

दरम्यान, बाजारात कांद्याला गुणवत्तेनुसार बाजारात दर मिळत आहेत. मात्र असे असताना सध्या भारतीय कांद्यालाच ग्राहक पसंती देत असल्याने दरात वाढ होत आहे. त्यातुलनेत आयात केलेला कांदा व्यापारी अन् ग्राहकांनी नाकारल्याने उन्हाळ कांद्याची मागणी टिकून आहे. तर अद्यापही लाल कांद्याची आवक होत नसल्याने अजूनही बाजारातील मागणी पुरवठा या आवकेवर पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी मिळाले ‘इतके’ कोटी रुपये

दर पाडण्याचा प्रकार –
सप्ताहाच्या सुरुवातीला दरात सुधारणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाली. त्यामुळे आवक वाढवून दर पाडण्याचा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App